
दुबई : सध्या सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना दागिने खरेदी करणं कठीण झालं आहे. अगदी छोटासा दागिना घ्यायचा म्हटलं तरी मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे. अशा परिस्थितीत दुबईतील एका प्रसिद्ध मॉलमध्ये चक्क सोन्याचे दागिने आणि हिऱ्यांचा वापर करून भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. या अनोख्या रांगोळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.
दुबईतील मॉलमध्ये दिवाळीनिमित्त खास आकर्षण
दुबईतील सिटी सेंटर देयरा या प्रसिद्ध मॉलमध्ये दिवाळीनिमित्त ही खास गोल्डन रांगोळी तयार करण्यात आली. दागिन्यांचा प्रसिद्ध ब्रँड डॅमस आणि दुबई फेस्टिव्हल्स अँड रिटेल इस्टॅब्लिशमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. भारतीय संस्कृतीतील रांगोळीच्या परंपरेला आलिशान आणि शाही स्वरूप देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
६.५ किलो सोनं आणि ३८० कॅरेटहून अधिक हिरे
या रांगोळीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी वापरण्यात आलेले मौल्यवान दागिने. तब्बल ६.५ किलो वजनाचे २१३ सोन्याचे दागिने या रांगोळीत वापरण्यात आले आहेत. यामध्ये सोन्याचे हार, जाड बांगड्या, झुमके आणि पेंडंट्स अशा विविध दागिन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दागिन्यांमध्ये ३८० कॅरेटहून अधिक वजनाचे हिरेही जडवण्यात आले आहेत. त्यामुळे ही रांगोळी केवळ कलाकृती न राहता मौल्यवान दागिन्यांचं अनोखं प्रदर्शन ठरली आहे.
دبئی میں دیوالی کے موقع پر معروف جیولری برانڈ ’داماس‘ کی جانب سے سٹی سینٹر دیرہ میں دنیا کی پہلی سنہری رانگولی نمائش کے لیے پیش کی گئی ہے۔ 6.5 کلوگرام داماس گولڈ اور ہیروں سے تیار کردہ اس 2×2 میٹر کی رانگولی میں ہار، چوڑیاں، کان کی بالیاں اور انگوٹھیوں سمیت 213 قیمتی زیورات کو ترتیب دیا گیا ہے دبئی جیسے شہر میں دیوالی کے نام پر ساڑھے چھ کلو خالص سونے اور ہیروں سے رانگولی سجانا اور اسے ثقافتی روایات کا نام دینا دراصل اس دور کی عیاشی اور دولت کی نمائش کا بدترین مظہر ہے جہاں دنیا کا ایک بڑا طبقہ بنیادی ضروریات اور معاشی بدحالی کی چکی میں پس رہا ہے۔ جہاں ایک طرف روایتی رانگولی رنگوں، پھولوں اور مٹی کے دیے جلانے جیسے سادگی اور خوشی کے پیغامات کی امین ہوتی ہے، وہیں دوسری طرف اسے سونے اور ہیروں کی چکاچوند میں بدل کر محض ایک برانڈ کی مارکیٹنگ اور اشرافیہ کی نمائش بنا دیا گیا ہے۔ دس کاریگروں کی سولہ گھنٹے کی محنت کو محض چند گھنٹوں کی تفریح اور کمرشل تشہیر کی نذر کرنا انسانی محنت کا استحصال نہیں تو اور کیا ہے، جو یہ دکھاتا ہے کہ آج کے دور میں تہواروں کی روح کو پسِ پشت ڈال کر دولت کا رعب جمانا ہی اصل مقصد بن چکا ہے۔
— Nuqta e Nazar - نقطۂ نظر (@fizimughal) November 7, 2026
१० कारागिरांची १६ तासांची मेहनत
ही आकर्षक रांगोळी साकारण्यासाठी कारागिरांना विशेष मेहनत घ्यावी लागली. प्रत्येक दागिना योग्य ठिकाणी ठेवून त्यातून सुंदर आणि आकर्षक नक्षी तयार करणं हे मोठं आव्हान होतं. यासाठी १० कुशल कारागिरांनी सलग १६ तास काम केलं. त्यांच्या मेहनतीतून ही भव्य गोल्डन रांगोळी साकारण्यात आली.
सोन्या-हिऱ्यांची रांगोळी पाहून नेटकरीही थक्क
या अनोख्या रांगोळीचा व्हिडिओ 'Dubai Festivals & Retail Events' या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ समोर येताच त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला. मॉलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि हिरे रांगोळीच्या स्वरूपात मांडलेले पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. काही नेटकऱ्यांनी या कलाकृतीचं कौतुक केलं, तर काहींनी एवढं सोनं सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवणं दुबईतच शक्य असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. सध्या ही सोन्या-हिऱ्यांची रांगोळी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.






