Thursday, November 12, 2026

Gold Rate : सोनं खरेदीची संधी की आणखी दरवाढीची प्रतीक्षा? डिसेंबरमध्ये मोठा उलटफेर शक्य!

दिवाळी नंतरच्या लगेच दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर आता 1 लाख 40 हजारांच्या खाली पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण पाहायला आहे. चांदीच्या दरात आज तब्ब्ल 3901 रुपयांची घसरण झाली आहे. एकीकडे सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसत असली तरी डिसेंबर महिन्यात सोन्याचे दर पुन्हा दीड लाख रुपयांचा टप्पा पार करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Gold Rate : दिवाळी नंतरच्या लगेच दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर आता 1 लाख 40 हजारांच्या खाली पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण पाहायला आहे. चांदीच्या दरात आज तब्ब्ल 3901 रुपयांची घसरण झाली आहे. एकीकडे सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसत असली तरी डिसेंबर महिन्यात सोन्याचे दर पुन्हा दीड लाख रुपयांचा टप्पा पार करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या कठोर भूमिकमुळं सोन्याच्या दरांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. तसेच क्रूड ऑईलच्या दरात देकील घसरण झाली सल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचा 24 कॅरेटचा दर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 1,38,500 रुपये प्रति तोळा आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 3955 डॉलर प्रति औंसवर आहे. अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेल्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 1,40,603 रुपयांवरुन 1,38,294 रुपयांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरात 2309 रुपयांची घसरण झाली आहे. शिवाय, 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. या सोन्याचा दर 1,28,792 रुपयांवरुन 1,26,677 रुपयांवर आला आहे. म्हणजेच आज 22 कॅरेट सोनं 2115 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तसेच सोन्याप्रमाणे चांदीच्या दरात देखील घसरण कायम आहे. चांदीच्या दरात भाऊबीजेला वाढ झाली होती मात्र आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. एक किलो चांदीचा दर 1,85,900 रुपयांवरुन 1,81,999 रुपये किलोवर आला आहे. एकंदरीतच, आज एक किलो चांदीचा दर 3901 रुपयांनी कमी झाला आहे. दरम्यान, सोने दरावर डॉलर मजबूत होत असल्याचा देखील परिणाम होत आहे. डॉलर मजबूत व्हायला लागला की गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळं सोन्याची मागणी कमी होते. आता जरी सोन्याचा दार घातला असला तरी, डिसेंबर महिन्यात दीड लाखांचा टप्पा सोने पार करु शकतो.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >