नागपूर: रामटेक तालुक्यातील कवडक येथे दत्ता मेघे फाऊंडेशन नागपूरद्वारा संचालित स्व. दत्ता मेघे स्मृती दालन, नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी संवाद साधताना, हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होत असून, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी संशोधन, कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती, नवाचार आणि नावीन्यता गरजेची आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान, हवामानाचा ताण सहन करणारी पिके आणि आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. उत्तम कृषी महाविद्यालयाची निर्मिती होणेही आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
Thane Railway Station: मध्य रेल्वेचे ठाणे हे प्रमुख आणि गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. ठाण्यावरून पनवेल, सीएसएमटी, कर्जत, कसारा, बदलापूर या सारख्या स्थानकावर ...
काय म्हणाले मुख्यमंत्री?
यंदा अल निनोचा प्रभाव आणि पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका पिकांना बसला. त्यामुळे हवामानाचा ताण सहन करणारी आणि कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारी पिके विकसित करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोग झाला पाहिजे. कृषी क्षेत्रात वैज्ञानिक संशोधन आणि त्याच्या उपयोजनाची सर्वाधिक आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
तसेच पुढे बोलताना, शेतीसोबतच पशुपालन हा शेतक-यांसाठी महत्त्वाचा आधार आहे. शेतीला पूरक म्हणून पशुपालन महत्वाचे आहे. देशी गाई केवळ दूध उत्पादनासाठी महत्त्वाच्या नसून संपूर्ण कृषी परिसंस्थेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन, पशुधनासाठी आधुनिक उपचार पद्धती आणि संशोधनाच्या माध्यमातून पशुपालकांना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून या क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
मेघे फाऊंडेशनच्या माध्यमातून रामटेकमध्ये उभारण्यात आलेली हे दोन्ही शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम ग्रामीण भागातील कृषी संशोधन, पशुसंवर्धन आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारे ठरतील. रामटेकच्या विकासासाठी या संस्था महत्त्वपूर्ण योगदान देतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तर मोहन भागवत यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जगाला विकासाचा नवा मार्ग दाखवायला हवा, असे सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांनी सांगितले.