Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खडबडीत होऊ नये म्हणून काय कराल? मऊ त्वचेसाठी लक्षात ठेवा 5 गोष्टी

काही वेळा त्वचेला भेगा पडण्याची समस्याही उद्भवते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेचा मऊपणा टिकवण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

1/6 दिवाळीनंतर हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. हिवाळ्यात तापमान कमी होण्यासोबतच हवेतील आर्द्रताही कमी होते. याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. अनेकांना या काळात त्वचा कोरडी, निर्जीव आणि खडबडीत होण्याचा त्रास जाणवतो. केवळ चेहराच नाही, तर हात आणि पायांची त्वचाही कोरडी पडू शकते. काही वेळा त्वचेला भेगा पडण्याची समस्याही उद्भवते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेचा मऊपणा टिकवण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. (AI IMAGE)

2/6 हिवाळ्यातही सनस्क्रीन लावा-  थंडीच्या दिवसांत सूर्यप्रकाश कमी जाणवत असला, तरी अतिनील किरणांमुळे (UV Rays) त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे. हवामान थंड असले तरी त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर टाळू नका. (AI IMAGE)

3/6  मॉइश्चरायझरचा नियमित वापर करा-  हिवाळ्यात त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे आंघोळीनंतर आणि चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेला अनुकूल मॉइश्चरायझर लावा. मुरुमांचा त्रास असलेल्या व्यक्तींनीही त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर निवडावे. (AI IMAGE)

4/6 शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवा - त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी बाहेरून काळजी घेण्यासोबतच शरीराला पुरेसे पाणी मिळणेही आवश्यक आहे. हिवाळ्यात तहान कमी लागल्याने अनेक जण पाणी पिणे टाळतात. मात्र, दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा. (AI IMAGE)

5/6 त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने निवडा -  प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्याने वापरलेले स्किन केअर प्रॉडक्ट आपल्यालाही अनुकूल असेलच असे नाही. डाग, मुरुम किंवा इतर त्वचेच्या समस्यांसाठी कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी त्वचेचा प्रकार लक्षात घ्या. समस्या कायम असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (AI IMAGE)

6/6 झोपण्यापूर्वी मेकअप काढा - रात्री मेकअप न काढता झोपल्यास त्वचेवर धूळ, तेल आणि मेकअपचे अवशेष साचू शकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी डबल क्लिन्झिंग पद्धतीचा वापर करता येतो. प्रथम मेकअप काढण्यासाठी योग्य क्लिन्झर वापरा आणि त्यानंतर फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. हिवाळ्यात त्वचेचा मऊपणा टिकवण्यासाठी नियमित स्वच्छता, मॉइश्चरा यझिंग आणि योग्य हायड्रेशन महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या त्वचेच्या गरजा वेगळ्या असल्याने त्यानुसारच स्किन केअर उत्पादने निवडा. त्वचेची समस्या वाढत असल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (AI IMAGE)

Comments
Add Comment

Anirudh Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्याच लग्न थाटामाटात पार पडलं, ग्रीसमधील लग्नाचे फोटो आले समोर

[caption id="attachment_1074372" align="alignnone" width="800"] 1. अखेर अनिरुद्ध-काव्या विवाहबंधनात!प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन

IND vs NZ मालिकेदरम्यान अर्शदीप सिंगचा साखरपुडा! समरीन कौरला गुडघ्यावर बसून केलं प्रपोज; रोमँटिक फोटो व्हायरल

[caption id="attachment_1074246" align="aligncenter" width="800"] भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने गर्लफ्रेंड समरीन कौरसोबत

आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडियाचाच डंका; शुभमन गिल अव्वल स्थानी, तर रोहित-विराटमध्ये जोरदार चुरस!

[caption id="attachment_1074142" align="aligncenter" width="800"] आयसीसीने आठवड्याभरानंतर वनडे क्रमवारी अपडेट केली आहे. या क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा

Gmail स्टोरेज वारंवार फुल होतोय? मग ‘ही’ ट्रिक वापरून काही सेकंदातच करा फ्री स्पेस

[caption id="attachment_1073767" align="aligncenter" width="800"] Gmail मध्ये असे अनेक जुने मेसेज असतात, ज्यांच्यासोबत फोटो, व्हिडिओ किंवा मोठे डॉक्युमेंट्स

Diwali beauty tips : दिवाळीत फेशियलसाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरच्या घरी बनवा दूध, तांदळाच्या पिठाचा खास फेसपॅक

[caption id="attachment_1073722" align="aligncenter" width="850"]

Padwa Wishes: पाडव्याच्या खास शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा प्रेम आणि आनंदाने भरलेले संदेश

[caption id="attachment_1073731" align="alignnone" width="800"] तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाची नवी पहाट उजाडो, पाडव्याच्या हार्दिक