
मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईकरांचा विमानतळ प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करण्यासाठी सिडकोने (CIDCO) अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) यांना थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'मेट्रो लाईन 8' प्रकल्पासाठी पर्यावरण आणि इतर आवश्यक वैधानिक मंजूरी मिळवण्याकरिता सिडकोने 'बिल्डिंग एन्व्हायरो प्रायव्हेट लिमिटेड' (Building Enviro Pvt Ltd) या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते भारत फोर्जच्या मुंढवा ...
सुमारे 35 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर सार्वजनिक- खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. सर्व आवश्यक परवानग्या वेळेत मिळाल्यास, या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला मार्च 2027 पासून सुरुवात करण्याचे सिडकोचे नियोजन आहे. या मेट्रो मार्गाची आखणी खारफुटीची जंगले आणि किनारी भागांतून होत असल्याने हा प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. त्यामुळे नियुक्त करण्यात आलेले सल्लागार सागरी किनारा नियंत्रण क्षेत्र (CRZ), वन आणि वन्यजीव विभागासह इतर सर्व आवश्यक परवानग्या मिळवण्याचे काम करतील.
कोणत्या परिसरातून धावणार मेट्रो?
मेट्रो लाईन 8 चा मेट्रो मार्ग मुंबई आणि नवी मुंबईतील महत्त्वाच्या उपनगरांना जोडणार आहे. यामध्ये कुर्ला, घाटकोपर पूर्व, वाशी, नेरुळ, सीवूड्स आणि तारघर या स्थानकांचा समावेश असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे खाडीवर विद्यमान पुलाला समांतर असा एक नवीन पूलही बांधण्यात येणार आहे. शिवाय, सायन- पनवेल महामार्गाच्या दक्षिणेस मानखुर्द आंतरराज्यीय बस टर्मिनसजवळील मिठागराच्या 27.2 हेक्टर जागेवर या मेट्रोसाठी भव्य कारशेड (डेपो) उभारण्याचा प्रस्ताव आहे.
मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन विभागाने गुरुवारी बेस्टच्या ताफ्यामध्ये 1500 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यासाठीच्या ...
विमानतळ विकासाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाला विशेष महत्त्व
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 'टर्मिनल 1' च्या पुनर्विकासाच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही विमानतळांना जोडणारा हा वेगवान मेट्रो मार्ग अत्यंत निर्णायक ठरणार आहे. यापूर्वी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (MIAL) 14 आंतरराष्ट्रीय ठिकाणांची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर हलवण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने त्याऐवजी प्रथम 'टर्मिनल 1 B' चा पुनर्विकास करण्याचा आणि त्यानंतर 'टर्मिनल 1 A' पाडण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
एकंदरीत, दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 'मेट्रो लाईन 8' हा प्रकल्प मुंबई महानगर क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे. सिडकोच्या या ताज्या निर्णयामुळे प्रकल्पाच्या कागदोपत्री प्रक्रियेला गती मिळाली असून, प्रवाशांना आता प्रत्यक्ष काम सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.




