Friday, November 13, 2026

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण ! मुंबई-पुण्यात 24 कॅरेट सोनं स्वस्त, चांदीचे भावही घसरले, पाहा आजचे दर

Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सुरू असलेली घसरण 13 नोव्हेंबर रोजीही कायम आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यावसायिक दिवशी दिल्ली, मुंबई, पुणे यांसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर खाली आले आहेत. सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता सराफा बाजारातील दरांकडे लागले आहे.

दिल्ली ते मुंबई, सोन्याचे दर किती झाले ?

13 नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 39 हजार 940 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 10 ग्रॅममागे 1 लाख 28 हजार 340 रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे, मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1 लाख 39 हजार 790 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 28 हजार 140 रुपये आहे. दिल्लीतील सराफा बाजारात यापूर्वी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम तब्बल 2,200 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली होती. बाजारातील मागणी कमी होणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरण यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

13 नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. (दर प्रति 10 ग्रॅम)

दिल्ली - ₹1,39,940 - ₹1,28,340

मुंबई - ₹1,39,790 - ₹1,28,140

पुणे - ₹1,39,790 - ₹1,28,140

कोलकाता - ₹1,39,79- ₹1,28,140

चेन्नई - ₹1,39,790 - ₹1,28,140

बंगळुरू -  ₹1,39,790 - ₹1,28,140

स्रोत : मनीकंट्रोल

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमती घसरल्या

भारतीय बाजारपेठेप्रमाणेच जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट भाव प्रति औंस 3,880.93 डॉलरवर पोहोचला आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतींमध्ये होणारे बदल, मागणी आणि आर्थिक घडामोडींचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही होत असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत सोन्याच्या दरांवर दिसून येत आहे.

चांदीचे दरही घसरले; किलोचा भाव किती?

सोन्याच्या दरातील घसरणीबरोबरच चांदीच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलो 1 लाख 99 हजार 900 रुपये नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात चांदीने प्रति किलो 4 लाख रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस 50.12 डॉलरवर आहे. त्यामुळे सध्या सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये नरमाई दिसून येत आहे.

सोने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, दागिने खरेदी करताना केवळ सोन्याचा बाजारभाव पाहून निर्णय घेऊ नका. दागिन्यांची घडणावळ, जीएसटी आणि इतर शुल्क यांचाही अंतिम किमतीवर परिणाम होतो. तसेच शहरानुसार आणि सराफानुसार दरांमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील सराफा बाजारात आजचा दर तपासणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >