Raul John Aju: वय 16, स्वतःची AI कंपनी; वडिलांनाही दिली 2 लाखांची नोकरी!

केरळमधील अवघ्या 16 वर्षीय राऊल जॉन अझूनेने AI क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वयाच्या 9 व्या वर्षी AI शिकण्यास सुरुवात करणाऱ्या राऊलने स्वतःची AI कंपनी उभारली असून, 15 जणांची टीम आणि 15 हून अधिक AI Tools विकसित केली आहेत.

क्रिकेटपासून ते बॉलिवूड आणि अगदी व्यवसायापर्यंत GenZ प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. या पिढीतील तरुण फक्त निवडलेल्या क्षेत्रातच उत्कृष्ट कामगिरी करत नाहीत, तर लहान वयात ते अशा गोष्टी करत आहेत ज्याची कल्पना प्रौढ अनुभवी व्यक्तीदेखील करू शकत नाहीत. ज्या वयात अनेक मुले आपल्या भविष्यातील करिअरचा मार्ग समजून घेण्यासाठी वेळ घेतात, त्याच वयात केरळमधील एका 16 वर्षांच्या मुलाने स्वतःचा एआय स्टार्टअप सुरू केला आहे. इतकेच नाही, तर त्याने या कामातून आपल्या वडिलांना रोजगारही मिळवून दिला.


राऊल जॉन अझूने वयाच्या 9 व्या वर्षी स्वतःहून AI शिकायला सुरुवात केली. वयाच्या 12 व्या वर्षी त्याने आपला पहिला रोबोट बनवला. वयाच्या 16 व्या वर्षी बारावीचे शिक्षण घेत असतानाच त्याने स्वतःची AI कंपनी सुरू केली होती. आता तो त्याच्या स्टार्टअपमध्ये 15 लोकांच्या टीमचे नेतृत्त्व करतो आणि त्याने 15 पेक्षा जास्त AI Tools विकसित केली आहेत. अवघ्या 16 वर्षांच्या मुलासाठी स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या कंपनीत कर्मचारी म्हणून नोकरी देणे आणि त्यांना 2 लाख रुपये पगार देणे हे अनेकांसाठी एक स्वप्न आहे. जॉन हा फक्त स्वतःची कंपनी चालवत नाही तर आपल्या वडिलांना रोजगारदेखील देतो. त्याचे वडील अजू जोसेफ यांना amazon, adobe, wipro आणि IBM यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. जॉनचा विश्वास आहे व्यवसाय आणि तंत्रज्ञानाचे जग समजून घेण्यासाठी केवळ फोनवरून शिकणे पुरेसे नाही. त्याला या क्षेत्रात व्यापक अनुभव असलेल्या व्यक्तीच्या पाठिंब्याची गरज आहे. म्हणूनच त्याने आपल्या वडिलांना त्याच्या कंपनीत काम करण्याची संधी दिली.






जॉनचा प्रवास आता केरळमधील त्याच्या शाळा आणि वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही. AI क्षेत्रातील त्याच्या कार्यामुळे तो तंत्रज्ञान, शिक्षण आणि सरकारी सेवांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या चर्चांचा भाग बनला आहे. त्याने केरळ आणि दुबईमध्ये सुरू केलेल्या अनेक उपक्रमांमध्येही योगदान दिले आहे. जॉनने नवी दिल्ली येथे India AI Impact Summit 2026 मध्येही सहभाग घेतला. त्याने संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या बाल सुरक्षा आणि एआय या विषयावरील सत्रात भाग घेतला आणि उद्घाटनपर भाषण दिले.


राऊल जॉन अजूची गोष्ट केवळ कोट्यवधींचा व्यवसाय उभारण्यापुरती किंवा वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी एआय (AI) क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यापुरती मर्यादित नाही. त्याचा प्रवास हेच दर्शवतो की, एखादे कार्य सुरू करण्यासाठी ठराविक वयाची किंवा पदवीची वाट पाहण्याची गरज नसते. त्याची गोष्ट अशा तरुणांसाठी एक उदाहरण ठरते, जे आपल्या कल्पनांचे वास्तवात रूपांतर करू इच्छितात.

Comments
Add Comment

हायकोर्टाच्या नावाने फसवणूक! 129 वेबसाइट्स ब्लॉक, पीएमओने मागितले स्पष्टीकरण

पंतप्रधान कार्यालयाने आज (१४ नोव्हेंबर) दूरसंचार सचिव अमित अग्रवाल यांना बोलावून एका मोठ्या पडताळणी

आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलायचा; तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही

[caption id="attachment_894861" align="aligncenter" width="1200"] आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी अनेकदा लोकांना तासनतास

Delhi Red Fort bomb blast : 'स्फोटाशी आमचा संबंध नाही'; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचा न्यायालयात दावा!

लाल किल्ला स्फोट प्रकरणात अटक केलेल्या आरोपींवरील आरोप निश्चितीसंदर्भात दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू

Cute Panda Viral Video : मुलीचा तोल गेला अन् थेट पांडाच्या पिंजऱ्यात कोसळली! पुढे जे घडले ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल...

सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात, तर

Gurugram couple car chase news : 'दिवाळीची रात्र ठरली जीवघेणी...' गुरुग्राममध्ये जोडप्याच्या कारचा फिल्मी स्टाईल पाठलाग; थेट घराच्या गेटपर्यंत आला संशयितांचा जमाव अन् पुढे...

गुरुग्राम : देशातील 'मिलेनियम सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि चकचकीत रोषणाईने नटलेल्या गुरुग्राम शहरातील

Sheikh Hasina Extradition: शेख हसीनांना परत नेण्यासाठी भारताची अट; बांगलादेशला काय करावं लागणार?

भारताने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी दोन अटी ठेवल्या आहेत.