बाळासाहेबांच्या स्मृतिदिनासाठी महापालिका सज्ज; महापौर रितू तावडेंचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील स्मृतिस्थळावर विशेष तयारी करण्यात येत आहे. महापौर रितू तावडे यांनी उपमहापौर संजय घाडी यांच्यासह आढावा बैठक घेत पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय मदत, दर्शन रांग आणि वाहतूक व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून शिवसैनिक तसेच नागरिक हे दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानस्थित स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतात. त्यादृष्टीने स्मृतिस्थळ व परिसरात सुसज्जता राखून आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ येथे महापालिकेच्या वतीने सेवा सुविधा पुरवल्या जात असल्या तरी आजवर कधीही महापौर आणि उपमहापौर यांनी आढावा घेतला नव्हता. पण भाजप आणि शिवसेना महायुतीची सत्ता येताच पहिल्याच महापौर रितू तावडे यांनी उपमहापौर संजय घाडी यांच्यासह या सेवा सुविधांचा आढावा घेत बाळासाहेबांवरील श्रद्धा त्यांनी व्यक्त केली.


मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. या अनुषंगाने स्मृतिदिन पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती दालनात, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी आढावा बैठक पार पडली. त्यावेळी महापौर तावडे यांनी हे निर्देश दिले.


या बैठकीस उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, सुधार समितीच्या अध्यक्ष संध्या दोशी, अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, जलअभियंता मंगेश शेवाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे, उपप्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) विजय गोतारणे, उप उद्यान अधीक्षक दशरथ घुले, उप प्रमुख अग्निशमन अधिकारी के. आर. यादव, कीटकनाशक अधिकारी रितेश मारापे, तसेच सहायक पोलीस आयुक्त (मध्य पश्चिम वाहतूक) दिलीप पाटील, सहायक पोलीस आयुक्त (समन्वय - मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय) मोहन खंदारे यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.



प्रारंभी, सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी पूर्वतयारीची माहिती दिली. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ आहे. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतिस्थळ व परिसरात पुरवावयाच्या नागरी सेवा-सुविधा तसेच स्मृतिस्थळावर करावयाची तयारी ही कामे सुरू करण्यात आली आहेत, असे नमूद करून त्याचा तपशील देसाई यांनी सादर केला.


उपमहापौर संजय घाडी म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि कार्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. यंदा बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम सुरू आहेत. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता, स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील स्मृतिस्थळावर महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक येतील. त्यामुळे महानगरपालिकेने पोलीस आणि इतर शासकीय विभागांच्या समन्वयाने पुरेशी व्यवस्था करावी. दर्शन रांगेतील नागरिकांसाठी छत, पिण्याचे पाणी, मैदानात धूळ प्रतिबंधक उपाययोजना, आसन व्यवस्था, सातत्याने परिसरात स्वच्छता, वाहतूक पोलिसांशी समन्वय या सर्व बाबींवर योग्य कार्यवाही करावी. समन्वय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक परिसरात प्रदर्शित करावेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची विविध छायाचित्रे परिसरात प्रदर्शित करावीत, इत्यादी सूचना घाडी यांनी दिल्या.






अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईसह महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांना मानणारा वर्ग महाराष्ट्रासह देशभरात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोठ्या संख्येने येणारे शिवसैनिक आणि नागरिक लक्षात घेता, महानगरपालिकेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या नागरी सेवा-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. पिण्याचे पाणी, दर्शन रांग, स्वच्छता, वाहतूक समन्वय, फिरती प्रसाधनगृहे यासह महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्ज ठेवाव्यात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि मुंबई महापौर वैद्यकीय सहायता कक्ष संलग्न वैद्यकीय कक्ष उभारून आवश्यक वैद्यकीय सेवा तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात. बाळासाहेब ठाकरे हे स्वतः कलासक्त होते. हे लक्षात घेता अभिवादनास साजेसे वाद्यसंगीत देणारे पथक असावे. त्याचप्रमाणे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निगडित इतर स्थळे, पुतळे, चौक इत्यादी ठिकाणी देखील स्मृतिदिनास साजेशी व्यवस्था करावी. आवश्यकता भासल्यास प्रशासनाने वाढीव निधी उपलब्ध करून घ्यावा आणि सुसज्ज व्यवस्था करावी, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले. या पूर्वतयारीची प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन पाहणी केली जाईल, असेही महापौरांनी नमूद केले.

Comments
Add Comment

BMC Hospital : महापालिकेचे भगवती रुग्णालय पी.पी.पी तत्वावर... आमदारांनी नागरिकांसह घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईची वाढती लोकसंख्या आणि महापालिका रुग्णालयांवरील वाढता रुग्णसेवेचा ताण लक्षात

दिवाळीच्या सुट्टीत चोरट्यांचा डल्ला! बंद घराची खिडकी तोडून चोरांनी लांबवले सोन्याचे दागिने

मुंबई: दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर गावी जात असतात. याचाच फायदा घेत, मुंबईतील चुनाभट्टीमध्ये

Mumbai Local Mega Block:  15 नोव्हेंबरला लोकलचा मेगा ब्लॉक; ठाणे-कल्याणसह पनवेल-वाशी मार्गावर वाहतुकीत बदल

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दिनांक 15 नोव्हेंबर

मुंबईत शिवशस्त्र शौर्यगाथेचा ऐतिहासिक ठेवा! वाघनखे, तलवारी पाहण्याची संधी; पुढील 6 महिने प्रदर्शन खुले

[caption id="attachment_1074960" align="aligncenter" width="800"] मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या विशेष

Mumbai Local: 26 ऑक्टोबरच्या मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग स्थानकावरील दुर्घटनेमागील नेमकं कारण काय? रेल्वेचा प्राथमिक निष्कर्ष समोर

मुंबई: कांजुरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T) यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे गेल्या

दुष्काळग्रस्तांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मोठा निर्णय; एक महिन्याचे 2 लाखांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे अत्यंत तीव्र स्वरूप पाहायला मिळत असून राज्यातील अनेक भागांना