रोहित शर्माची न्यूझीलंडमधील निराशाजनक कामगिरी
रोहित शर्माचा न्यूझीलंडमधील रेकॉर्ड काही चांगला नाही. आतापर्यंत त्याने जगभरात अनेक धावा आणि विक्रम रचले. मात्र न्यूझीलंडमध्ये त्याची बॅट कायम शांत राहिली आहे. न्यूझीलंडच्या भूमीत त्याला एकही शतक ठोकता आलेलं नाही. न्यूझीलंडमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत 18 वनडे सामने खेळले असून 460 धावा केल्या आहे. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माने शतकं ठोकलंच नाही, असं अजिबात नाही. त्याने न्यूझीलंडविरुद्ध दोन शतकं ठोकली आहेत. पण ही शतकं न्यूझीलंडच्या भूमीत नाहीत, तर इतर ठिकाणी आहेत. या मालिकेत रोहित शर्माला शतक सोडा, अर्धशतक करणंही कठीण झालं आहे.
IND vs NZ 5th ODI Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वनडे सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. चार सामन्यानंतर मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. भारताने सुरूवातीचे सलग दोन सामन्यात विजय ...
रोहित शर्माचा शेवटचा न्यूझीलंड दौरा
रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपर्यंत खेळेल, असा क्रीडाप्रेमी आणि तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी हा शेवटचा न्यूझीलंड दौरा असणार आहे. कारण यानंतर होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यात रोहित शर्मा नसेल, हे नक्की आहे. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये शतक ठोकण्याची त्याच्यासाठी शेवटची संधी आहे. पाचव्या वनडे सामन्यात शतकी खेळी करण्यापासून चुकला तर ही त्याला परत कधीच मिळणार नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींच्या आणि त्याच्या चाहत्यांचा नजरा लागून आहेत.