Saturday, November 14, 2026

6,6,6,6,6,4,4,4,4,4,4..! सूर्यकुमार यादवने फक्त 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक, मुंबईचा सहज विजय

सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी धडपड करत आहे. मात्र संधी मिळणं कठीण आहे. असं असताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी प्रयत्न सुरू आहेत. असं असताना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत सूर्यकुमार यादवने झंझावाती खेळी केली.

1/5 सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद मिळवलं. पण सूर्यकुमारचा फॉर्म काही चांगला नव्हता. अंतिम फेरीतही सूर्यकुमार काही खास करू शकला नव्हता. त्यामुळे त्याचं कर्णधारपद गेलं आणि त्याचं संघातील स्थानही गेलं. पण आता संघात पदार्पणासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. (Photo: ANI) 2/5 आयपीएल 2026 स्पर्धेनंतर सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच स्पर्धात्मक क्रिकेट स्पर्धेत उतरला. देशांतर्गत टी20 क्रिकेट स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करत आहे. पहिल्याच सामन्यात त्याने हैदराबादविरुद्ध आक्रमक फलंदाजीचा नजराणा सादर केला. (Photo: ANI) 3/5 मुंबई आणि हैदरबाद यांच्यात कोलकाता येथे सामना खेळला गेला. या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी सूर्यकुमार यादवने केली. त्याने 15 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. तसेच 21 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी केली. (Photo: ANI) 4/5 सूर्यकुमार यादवने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 285.71 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या खेळीत त्याने सहा चौकार आणि पाच षटकार मारले. (Photo: ANI) 5/5 खरं तर हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी 173 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सूर्यकुमार यादवच्या खेळीमुळे हे आव्हान मुंबईने 13.1 षटकात पूर्ण केलं. तसेच या स्पर्धेत विजयी सुरुवात केली. (Photo: ANI)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >