Nashik : नाशिक कोतवाल भरती परीक्षा पुढे ढकलली ! 15 नोव्हेंबरऐवजी आता 'या' दिवशी होणार परीक्षा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील रिक्त १५५ कोतवाल पदांसाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा १७ जानेवारी २०२७ रोजी घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.



वयोमर्यादेतील शिथिलतेमुळे परीक्षा स्थगित


नाशिक जिल्ह्यातील १५५ रिक्त महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना nashik.kotwal.org या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, राज्य शासनाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार काही भरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्याची तरतूद करण्यात आली आहे.


या निर्णयानुसार, १ जानेवारी २०२६ पासून संबंधित शासन निर्णय जारी होईपर्यंत ज्या पदभरतींच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत; मात्र निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पूर्ण झालेला नाही, अशा भरती प्रक्रियांना कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याचे नमूद करण्यात आले आहे.






कोतवाल भरतीला वयोमर्यादेची सवलत लागू होणार का ?


शासनाच्या नव्या निर्णयातील वयोमर्यादेची सवलत महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीला लागू होते की नाही, याबाबत संबंधित विभागाकडून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. या संदर्भात स्पष्टता येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश महसूल विभागाने दिले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



आता १७ जानेवारी २०२७ रोजी परीक्षा


शासनाच्या सुधारित वेळापत्रकानुसार कोतवाल पदभरतीची परीक्षा आता १७ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सुधारित तारखेनुसार नियोजन करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. परीक्षेच्या तारखेसह इतर महत्त्वाच्या माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचेही त्यांनी सांगितले आहे.


उमेदवारांसाठी महत्त्वाचे :


- भरती : महसूल सेवक (कोतवाल)


- एकूण रिक्त पदे : १५५


- जुनी परीक्षा तारीख : १५ नोव्हेंबर २०२६


- नवीन परीक्षा तारीख : १७ जानेवारी २०२७


- अधिकृत संकेतस्थळ : nashik.kotwal.org

Comments
Add Comment

Nashik Crime : नाशिकमध्ये चोराचा पोलिसांशी थरार ! पोलिसांना कुलूप फेकून मारले अन् अटकेच्या भीतीने थेट ...

नाशिक : घरफोडी करण्यासाठी घरात शिरलेल्या सराईत चोराने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र,

नायगाव लोकलमधील छेडछाड प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; महाराष्ट्र पोलिसांना 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई : नायगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून खाली ढकलल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या 20 वर्षीय तरुणीच्या प्रकरणाची

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव खासगी बस पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली; एकाचा मृत्यू, तर 20 जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर एका भीषण अपघाताची थरारक घटना समोर आली

मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षातील नजर आता अधिक तीक्ष्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील सर्व ठिकाणांवर एकाच वेळी लक्ष ठेवण्यात येणाऱ्या महापालिका आपत्कालिन नियंत्रण

Nashik : येवलेकरांसाठी मोठी बातमी ! कोपरगाव-येवला-मनमाड-मालेगाव महामार्ग सहापदरी होणार ? बायपासचा DPR तातडीने तयार करण्याचे छगन भुजबळांचे निर्देश

येवला : येवला शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेता कोपरगाव–येवला–मनमाड–मालेगाव

Nashik : दिवाळीनंतर नाशिकमध्ये कचऱ्याचा डोंगर ! 15 दिवसांत तब्बल 13 हजार 538 टन कचरा जमा

नाशिक : दिवाळी सणाच्या काळात बाजारपेठांमधील वाढलेली खरेदी-विक्री, व्यावसायिक उलाढाल आणि घराघरांत झालेल्या