Nashik : येवलेकरांसाठी मोठी बातमी ! कोपरगाव-येवला-मनमाड-मालेगाव महामार्ग सहापदरी होणार ? बायपासचा DPR तातडीने तयार करण्याचे छगन भुजबळांचे निर्देश

कोपरगाव–येवला–मनमाड–मालेगाव या सुमारे ७६ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी केंद्र सरकारकडून ९८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.

येवला : येवला शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेता कोपरगाव–येवला–मनमाड–मालेगाव महामार्गाचे चौपदरीकरण न करता सहापदरीकरणाच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच येवला शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी बाह्यवळण रस्त्याचा (बायपास) सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तातडीने तयार करण्याचे निर्देश त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना दिले आहेत.



९८० कोटींचा निधी मंजूर; महामार्गाच्या कामाचा आढावा


कोपरगाव–येवला–मनमाड–मालेगाव या सुमारे ७६ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी केंद्र सरकारकडून ९८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या कामाच्या अनुषंगाने नाशिक येथील कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत NHAI च्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी महामार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. येवला शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण, बायपासची आवश्यकता आणि भविष्यातील वाहनांची वाढती संख्या या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.



चौपदरीकरणाऐवजी सहापदरीकरणाचा विचार करा


महामार्गाचे नियोजन करताना केवळ सध्याची वाहतूक लक्षात न घेता भविष्यातील गरजांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. वाढत्या वाहनसंख्येमुळे भविष्यात पुन्हा रस्त्याच्या विस्ताराची वेळ येऊ नये, यासाठी आतापासूनच सहापदरीकरणाच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक तरतुदी कराव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच येवला शहरातून जाणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाह्यवळण रस्त्याचा स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्याचा पुढील नियोजनात समावेश करण्याचेही निर्देश देण्यात आले.






९८० कोटींच्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी


येवला शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. कोपरगाव–येवला–मनमाड–मालेगाव हा महामार्ग सहापदरी काँक्रीटचा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पत्रव्यवहाराद्वारे केली होती. या पाठपुराव्यानंतर भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने १९ जून २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० एच आणि ७५२ जी अंतर्गत कोपरगाव ते मालेगाव या सुमारे ७६ किलोमीटरच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी ९८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.



औद्योगिक आणि व्यापारी वाहतुकीसाठी महामार्ग महत्त्वाचा


कोपरगाव–येवला–मनमाड–मालेगाव हा महामार्ग नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे आणि मालेगाव यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना जोडतो. त्यामुळे औद्योगिक, व्यापारी आणि कृषी वाहतुकीच्या दृष्टीने या मार्गाचे महत्त्व मोठे आहे. आगामी काळात या मार्गावरील वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने महामार्गाचे सहापदरीकरण आणि येवला शहरासाठी बायपासचे नियोजन आताच करणे गरजेचे असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत नमूद केले.


आता येवला शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने बायपासच्या DPR कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सहापदरी महामार्ग आणि बाह्यवळण रस्त्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास येवलेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

Nashik : दिवाळीनंतर नाशिकमध्ये कचऱ्याचा डोंगर ! 15 दिवसांत तब्बल 13 हजार 538 टन कचरा जमा

नाशिक : दिवाळी सणाच्या काळात बाजारपेठांमधील वाढलेली खरेदी-विक्री, व्यावसायिक उलाढाल आणि घराघरांत झालेल्या

आसाममधील काझीरंगा अपघातातील मृतांचा आकडा 26 वर; 23 जणांची ओळख पटली, देशभरात हळहळ

दिसपूर : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातातील मृतांची संख्या वाढून 26 वर

Jalgaon Earthquake : जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ! रावेरसह अनेक तालुके हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेरसह अनेक तालुक्यांमध्ये शनिवारी सकाळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने

बीसीसीआयच्या अंडर-19 महिला क्रिकेट टीममध्ये निवड झालेल्या खेळाडूची राहत्या घरी आत्महत्या; क्रीडाविश्वात एकच खळबळ!

सध्या देशभरात महिला क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढT असताना आणि युवा खेळाडू आपल्या उज्ज्वल भविष्याचे

यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या बसला भीषण आग ! बसमध्ये 40 प्रवाशांची आरडाओरड अन्...; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या प्रवासी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

Nashik Crime : लग्नास नकार दिल्याचा संताप अनावर, तरुणीचं थेट बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार केलं अन्...; नाशिकमध्ये खळबळ

नाशिक : लग्न करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका तरुणाने तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक