Saturday, November 14, 2026

Ramayana box office collection : रणबीर कपूरच्या 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या ९ दिवसांत गाठला १,१११ कोटींचा टप्पा!

प्रदर्शनानंतर अवघ्या नऊ दिवसांतच या पौराणिक महाकाव्याने जगभरात १,१०० कोटींहून अधिक कमाई करत एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. दिवाळीचा वीकेंड संपल्यानंतरही चित्रपटाच्या कमाईचा वेग कायम असून, प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या घोडदौडीतही दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट जागतिक बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत अजूनही 'रामायण'च्या पुढे आहे. नवव्या दिवशी 'रामायण'ने 'धुरंधर २' पेक्षा जास्त कमाई केली असली, तरी एकूण आकडेवारीच्या बाबतीत 'धुरंधर २' आघाडीवरच आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रणबीर कपूर, (Ranbir Kapoor) साई पल्लवी (Sai Pallavi)  आणि यश (Yash) यांच्या बहुचर्चित 'रामायण' (आंतरराष्ट्रीय स्तरावर 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड') या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या नऊ दिवसांतच या पौराणिक महाकाव्याने जगभरात १,१०० कोटींहून अधिक कमाई करत एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. दिवाळीचा वीकेंड संपल्यानंतरही चित्रपटाच्या कमाईचा वेग कायम असून, प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या घोडदौडीतही दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट जागतिक बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत अजूनही 'रामायण'च्या पुढे आहे. नवव्या दिवशी 'रामायण'ने 'धुरंधर २' पेक्षा जास्त कमाई केली असली, तरी एकूण आकडेवारीच्या बाबतीत 'धुरंधर २' आघाडीवरच आहे.

कमालीची कमाई आणि मोडले अनेक रेकॉर्ड्स

प्रसिद्ध ट्रेड ट्रॅकर 'सॅकनिल्क' (Sacnilk) ने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 'रामायण'ने आतापर्यंत फक्त भारतीय बाजारात तब्बल ७३२.५० कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. याशिवाय, परदेशातील प्रेक्षकांनीही या चित्रपटाला भरघोस दाद दिली असून, नवव्या दिवशी परदेशी बाजारपेठेतून २५ कोटी रुपयांची भर पडली आहे. यामुळे चित्रपटाची आंतरराष्ट्रीय ग्रॉस कमाई ३७८.५० कोटी रुपयांवर पोहोचली असून, जगभरातील एकूण कलेक्शन १,१११ कोटी रुपये झाले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने रिलीजच्या फक्त आठव्याच दिवशी १,००० कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात प्रवेश केला होता. आजवरच्या इतिहासात केवळ 'पुष्पा २: द रुल' आणि 'धुरंधर २: द रिव्हेंज' या दोनच चित्रपटांनी अवघ्या सात दिवसांत हा पराक्रम केला होता. या वेगवान कमाईच्या जोरावर 'रामायण'ने 'बाहुबली २' (१० दिवस), 'आरआरआर' (१६ दिवस) आणि 'केजीएफ २' (१८ दिवस) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. तसेच, शाहरुख खानच्या 'जवान' (१८ दिवस) आणि 'पठाण' (२७ दिवस) या चित्रपटांनाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.

'कल्की' आणि 'पठाण' ठरले मागे

नवव्या दिवशी जगभरात झालेल्या कमाईचा विचार केला तर, 'रामायण'ने प्रभासच्या 'कल्की २८९८ एडी' आणि शाहरुख खानच्या 'पठाण' या दोन्ही चित्रपटांना मागे सोडले आहे. नवव्या दिवसापर्यंत 'कल्की'ने जगात ७१४.५३ कोटी आणि 'पठाण'ने ६९६.९८ कोटी रुपयांची कमाई केली होती, ज्याच्या तुलनेत 'रामायण'ची कामगिरी अत्यंत सरс ठरली आहे. दुसरीकडे, रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट अजूनही शर्यतीत पुढे आहे. या चित्रपटाने नवव्या दिवशी परदेशातून २३ कोटी रुपये कमावले. 'धुरंधर २' ची भारतातील ग्रॉस कमाई ८५७.१९ कोटी रुपये असून, त्याचे जागतिक संकलन १,१५१.१९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे नवव्या दिवशी 'रामायण'ची कमाई जास्त झाली असली, तरी एकूण जगभरातील कमाईत 'धुरंधर २' अजूनही पुढे आहे.

चित्रपटाची स्टार कास्ट आणि भव्यता

दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने हा चित्रपट बनवला आहे, जो ५ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीच्या खास पर्वावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे, रणबीर कपूर: प्रभू श्रीराम, साई पल्लवी: माता सीता, यश: रावण, सनी देओल: हनुमान, अरुण गोविल: राजा दशरथ (ज्येष्ठ अभिनेते) हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट दोन भागांमध्ये बनवला जात असून, याचा दुसरा भाग २०२८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान

बॉक्स ऑफिसवरील या घसघशीत यशान्यानंतर आता 'रामायण'च्या झोळीत आणखी एक मोठा बहुमान पडला आहे. आगामी ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI), जो गोव्यात येत्या २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, या महोत्सवातील 'ब्रिक्स' (BRICS) विभागाचे उद्घाटन याच चित्रपटाने होणार आहे. 'पीआयबी' (PIB) ने दिलेल्या माहितीनुसार, या विभागात दाखवला जाणारा हा पहिलाच चित्रपट असेल. या विशेष विभागात सर्व ११ ब्रिक्स देशांचे आणि भागीदार राष्ट्रांचे उत्कृष्ट चित्रपट दाखवले जाणार आहेत, जेणेकरून प्रेक्षकांना वेगवेगळ्या देशांतील चित्रपट संस्कृतीचा अनुभव घेता येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >