भारताच्या पारड्यात कसा पडला सामना?
भारतीय संघाला सातवा धक्का 251 धावांवर बसला, त्यानंतर लगेचच म्हणजे 252 धावांवर आठवी विकेट पडली. त्यानंतर नवव्या विकेटसाठी मनल चौहान आणि मोहित उलवा ही जोडी मैदानात होती. या जोडीने 35 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. मनल चौहान 32 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. त्यामुळे भारतीय संघावर पुन्हा दडपण वाढलं. 16 चेंडूत भारताला 29 धावांची गरज होती आणि शेवटची विकेट हातात होती. चिगुरूपती वेंकटा मैदानात आला होता. शेवटची विकेट असल्याने आणि सामना जिंकावा यासाठी क्रीडाप्रेमींनी देवाचा धावा सुरू केला होता. मोहित उलवा चांगला खेळत होता, पण त्याला वेंकटा साथ देईल का? हा प्रश्न होता. पण पुढे 16 चेंडूचा थरार भारतीय क्रीडाप्रेमींनी अनुभवला. प्रत्येक चेंडूवर भारतीय संघाची धाकधूक वाढली होती. इतकंच शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी 3 धावांची गरज होती. या चेंडूवर मोहित उलवाने चौकार मारला आणि भारताला विजय मिळवून दिला.
U19 Asia Cup 2026 अंतिम स्पर्धेत भारताचा शेवटच्या चेंडूवर विजय, पाकिस्तानचा हिशेब केला चुकता
एसीसी आशिया कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि ...
शेवटच्या षटकात 8 धावांची गरज आणि...
मोहित उलवा शेवटच्या षटकात स्ट्राईकला होता. पहिलाच चेंडू निर्धाव गेला आणि पाकिस्तानकडून स्टम्पिंगसाठी जोरदार अपील करण्यात आलं. सुदैवाने मोहित उलवा वाचला आणि भारताच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर चेंडू वाइड पडला आणि 5 चेंडूत 7 धावा अशी स्थिती आली. मोहितने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि वेंकटाला स्ट्राईक दिली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर वेंकटाने एक धाव घेत मोहितला स्ट्राईक दिली. तीन चेंडू आणि 5 धावा अशी स्थिती आली. मोहितने पुन्हा एक धाव काढली आणि वेंकटा स्ट्राईकवर आली. आता दोन चेंडूत 4 धावा अशी स्थिती आली. त्यामुळे भारतासाठी करो या मरोची स्थिती होती. पाचव्या चेंडूवर वेंकटाने एक धाव काढली आणि 1 चेंडूवर 3 धावा अशा स्थितीत सामना आणला. मोहित उलवाचा जम बसला होता आणि त्याच्याकडून अपेक्षाही होत्या. तसंच घडलं. मोहित उलवाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि भारत विजयी झाला.