U19 Asia Cup 2026 अंतिम स्पर्धेत भारताचा शेवटच्या चेंडूवर विजय, पाकिस्तानचा हिशेब केला चुकता

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानने विजयासाठी 338 धावांचं लक्ष ठेवलं होतं. हे लक्ष्य भारताने शेवटच्या चेंडूवर गाठलं.

एसीसी आशिया कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 50 षटकात 9 गडी गमवून 337 धावा केल्या आणि विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही भारतीय संघासाठी कठीण होतं.. भारताने या धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर डाव गडगडला. त्यामुळे हा सामना हातून गेला असंच प्रत्येकाला वाटलं. पण नवव्या विकेटसाठी मनल चौहान आणि मोहित उलवा यांनी 57 धावांची भागीदारी केली आणि भारताचा विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आणि झालंही तसंच... भारताला शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती आणि एक विकेट हातात होती. मोहित उलवाने चौकार मारला आणि भारताला विजय मिळवून दिला. भारताने अंडर 19 आशिया कप स्पर्धेत नवव्यांदा जेतेपद पटकावलं आहे. तसेच पाकिस्तानचा मागच्या स्पर्धेतील आणि साखळी फेरीतील पराभवाचा वचपाही काढला.

भारताचा डाव


पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 338 धावांचा पाठलाग करताना भारताने आश्वासक सुरूवात केली. आर्यवीर सेहवाग आणि लक्ष्य रायचंदानी यांनी पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. पण आर्यवीर 58 धावा करून बाद झाला आणि भारताचा डाव गडगडला. कर्णधार रायचंदानी एका बाजूने खिंड लढवत होता. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळाली नाही. वीके विनीथ 24, अर्जुन राजपूत 9 आणि अन्वय द्रविड 19 धावा करून बाद झाले. तर लक्ष्य रायचंदानी याचा खेळही 80 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताचा पराभव निश्चित जवळपास निश्चित झाला होता. आर्यन सवसानीही फार काही करू शकला नाही. त्याने 14 चेंडूत 9 धावा केल्या आणि बाद झाला. काव्या पटेलला तर खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे भारताचा पराभव हा निश्चित झाला. मनल चौहान आणि मोहित उलवा यांनी नवव्या विकेटसाठी 35 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताच्या विजयाच्या आशा जिवंत झाल्या. पण मनल चौहान 47 धावांवर बाद झाला आणि पुन्हा धाकधूक वाढली. मोहित उलवाने शेवटपर्यंत किल्ला लढवला आणि भारताला विजय मिळवून दिला.. मोहित शर्माने 26 चेंडूत नाबाद 49 धावांची खेळी केली.





पाकिस्तानचा डाव


पाकिस्तानकडून उस्मान खान आणि हयाम खान यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. ही जोडी काव्या पटेलने फोडली. मात्र त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि अब्दुल कादीर ही जोडी जमली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 113 चेंडूत 135 धावांची भागीदारी केली. ही भारतीय संघाला महागात पडली. अब्दुल कादीर 54 चेंडूत 80 धावा करून बाद झाला. तर उस्मान खानने 111 चेंडूत 107 धावांची खेळी केली. कर्णधार फरहान युसफने 63, अहमनद हुसैनने 17, हमजा जहूरने 10, हसनैन अब्बास दारने 2, मोहम्मद सय्यमने 7, निकाब शफिकने 11 धावा केल्या. तर रिझवानुल्ला नाबाद 4 आणि अली रझा नाबाद 0 धावांवर राहिले. भारताकडून काव्या पटेलने सर्वाधिक 4 विकेट काढल्या. तर चिगुरूपती वेंकटाने 3 आणि अर्जुन राजपूतने 1 विकेट काढली.
Comments
Add Comment

IND vs NZ 5th ODI: रोहित शर्माकडे शेवटची संधी! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर पुढचं काय ते ठरणार?

भारत न्यूझीलंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना खऱ्या अर्थाने रोहित शर्मासाठी

उस्मान ख्वाजाकडे पुरावा असेल...! सँडपेपरगेट प्रकरणावर दक्षिण अफ्रिकन खेळाडूंची प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियन संघ 2018 मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर होता आणि सँडपेपर प्रकरण घडलं होतं. चेंडूची स्थिती बदलण्यासाठी

IND vs NZ 5th ODI Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वनडे सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. चार सामन्यानंतर मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे.

IND vs NZ Test Series: पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियात मोठा बदल, कुलदीप यादव बाहेर आणि...

न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात

6,6,6,6,6,4,4,4,4,4,4..! सूर्यकुमार यादवने फक्त 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक, मुंबईचा सहज विजय

[caption id="attachment_1075114" align="aligncenter" width="800"] सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद मिळवलं. पण सूर्यकुमारचा फॉर्म

बीसीसीआयच्या अंडर-19 महिला क्रिकेट टीममध्ये निवड झालेल्या खेळाडूची राहत्या घरी आत्महत्या; क्रीडाविश्वात एकच खळबळ!

सध्या देशभरात महिला क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढT असताना आणि युवा खेळाडू आपल्या उज्ज्वल भविष्याचे