SBI Data Leak : SBI च्या लाखो ग्राहकांचा डेटा चोरीला? नवी मुंबईतील सर्व्हरवर सायबर हल्ला, 3.75 लाख रेकॉर्ड्स लंपास

यामध्ये ग्राहकांची नावे, मोबाईल क्रमांक, घराचे पत्ते, कर्जासाठी केलेले अर्ज आणि नवीन बँक खाते उघडण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

नवी मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील बँकेच्या ग्लोबल आयटी सेंटरवर सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात हॅकर्सनी सुमारे 3.75 लाख रेकॉर्ड्स चोरल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांची नावे, मोबाईल क्रमांक, घराचे पत्ते, कर्जासाठी केलेले अर्ज आणि नवीन बँक खाते उघडण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. ( SBI Data Breach)


मिळालेल्या माहितीनुसार, हा सायबर हल्ला 10 ते 15 ऑक्टोबरदरम्यान झाला होता. मात्र, चोरी झालेली माहिती डार्क वेबवर अपलोड झाल्यानंतर हा प्रकार बँकेच्या निदर्शनास आला. त्यानंतर बँकेने अंतर्गत तपास सुरू केला. या प्रकरणी 12 नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.






बँकेच्या तक्रारीनुसार, 'सिरियासिम' (Syriasim) नावाच्या हॅकर ग्रुपशी संबंधित अज्ञात व्यक्तींनी सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवून महत्त्वाची माहिती चोरली. या हल्ल्यात सुमारे 32 CSV फाईल्समधील 3.75 लाख रेकॉर्ड्स चोरीला गेल्याची माहिती आहे. याशिवाय JSON फाईल्स आणि 2,721 PDF फाईल्सही हॅकर्सनी लंपास केल्याचा दावा करण्यात आला आहे. या कागदपत्रांमध्ये सुमारे 4,280 ग्राहकांची संवेदनशील वैयक्तिक माहिती असल्याचे सांगितले जात आहे. ( SBI customers)


दरम्यान, बँकेने डार्क वेबवर उपलब्ध असलेला चोरीचा डेटा हटवण्यासाठी प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र, हॅकर्सनी या माहितीच्या प्रती तयार केल्या असतील किंवा इतर ठिकाणी शेअर केल्या असतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.



SBI ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?


या घटनेनंतर सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी बँक ग्राहकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. चोरी झालेल्या माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार बनावट कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे ग्राहकांची फसवणूक करू शकतात. त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणालाही OTP, ATM पिन, बँकिंग पासवर्ड किंवा गोपनीय माहिती देऊ नका. बँकेच्या नावाने फोन करून वैयक्तिक माहिती मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. आपल्या बँक खात्यातील व्यवहारांवरही नियमित लक्ष ठेवा.

Comments
Add Comment

Maharashtra drought : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऊस उत्पादकांसाठी प्रति टन 500 ते 700 रुपयांच्या अनुदानाची मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण

Lalit Modi British Citizenship: आयपीएलचे संस्थापक ललित मोदी झाले ब्रिटिश नागरिक, ऑक्सफर्ड युनियनमध्ये केली घोषणा

इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी

Old Khopta Bridge: वर्षभरानंतर उरणचा खोपटा पूल पुन्हा सुरू, जेएनपीए आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा

उरणमधील जुना खोपटा पूल तब्बल वर्षभर बंद राहिल्यानंतर अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवारी,14 नोव्हेंबर

Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या! गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे दोन दिवस वाहतुकीत बदल; 'या' मार्गांवर नो-पार्किंग

पुणे :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत

International Film Festival: 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार ब्रिक्स देशांतील 21 चित्रपटांचे सादरीकरण

57 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फी 2026 मध्ये ब्रिक्स देशांतील चित्रपटांचे विशेष दालन असणार आहे. या

Ketan Agrawal murder case : सिया गोयल जेलमधून बाहेर येणार? वकिलांनी कोर्टात सादर केले 'हे' मोठे पुरावे; जाणून घ्या नेमकं काय घडलं...

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या लोहगड किल्ल्याच्या परिसरात केतन अग्रवाल या तरुणाचा 400 फूट खोल