Ketan Agrawal murder case : सिया गोयल जेलमधून बाहेर येणार? वकिलांनी कोर्टात सादर केले 'हे' मोठे पुरावे; जाणून घ्या नेमकं काय घडलं...

या प्रकरणात पोलिसांनी डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांचे जबाबही गोळा केले आहेत.













पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या लोहगड किल्ल्याच्या परिसरात केतन अग्रवाल या तरुणाचा 400 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांचे जबाबही गोळा केले आहेत.


दरम्यान, आता या प्रकरणात सिया गोयलच्या जामीन अर्जामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सियाच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत जामिनाची मागणी केली आहे. केवळ फोन कॉल आणि चॅटिंगच्या आधारे हत्येचा कट सिद्ध होऊ शकत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला आहे. तसेच सिया तरुण असून खटल्याची सुनावणी पूर्ण होण्यासाठी बराच काळ लागू शकतो, असेही वकिलांनी न्यायालयात सांगितले.






सियाच्या वकिलांनी जामीन अर्जात 4 प्रमुख मुद्दे मांडले आहेत. पहिला मुद्दा घटनास्थळाबाबत आहे. केतनच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी पाहणी केली असता, तो ज्या ठिकाणाहून पडल्याचे सांगितले जात आहे, तेथून पडणे शक्य नसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता.


दुसरा मुद्दा तक्रारीशी संबंधित आहे. केतनच्या चुलत्याच्या मित्राकडून सिया आणि चेतन यांच्या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर संशयाच्या आधारे तक्रार करण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाने केला आहे. तिसऱ्या मुद्द्यात सिया आणि चेतन यांच्यातील फोनवरील संभाषण किंवा चॅट म्हणजे हत्येचे नियोजन असल्याचे सिद्ध होत नाही, असे म्हटले आहे. चौथा मुद्दा म्हणजे आरोपींच्या कथित जबाबांव्यतिरिक्त स्वतंत्र आणि ठोस पुरावे नसल्याचा बचाव पक्षाचा दावा आहे. केतनचा मृत्यू फोटो काढताना झालेला अपघात होता, असेही वकिलांनी म्हटले आहे.


दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणात 5,053 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये डिजिटल पुराव्यांसह 3 महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या साक्षीदारांच्या जबाबांनाही खटल्यात महत्त्व राहणार आहे. दरम्यान, सिया गोयलच्या जामीन अर्जावर 17 नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालय या प्रकरणातील पोलिसांचे पुरावे आणि बचाव पक्षाचे युक्तिवाद यावर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







Comments
Add Comment

IND vs NZ, 5th ODI : न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली! रोहित-विराट फ्लॉप, 2013 नंतर पुन्हा तेच घडलं

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. भारतीय संघाचा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल; पहाटे आणि रात्री गारवा वाढला, पुढील काही दिवस कसे असेल हवामान?

Maharashtra Weather : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील हवामानात हळूहळू बदल होताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर

US flight delays : अमेरिकेत विमानसेवा विस्कळीत! हजारो उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल; तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ

US flight delays : अमेरिकेतील विमान प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या

Assembly Elections 2026 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार तारखा

Assembly Elections 2026 : देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा

Under 19 Asia Cup 2026: शेवटच्या चेंडूवर विजय, मैदानात जल्लोष! पाहा भारताच्या अंडर-19 आशिया कप विजेतेपदाचे खास क्षण

[caption id="attachment_1075318" align="alignnone" width="800"]  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील Under 19 आशिया चषकाचा अंतिम सामना सर्वार्थाने परिपूर्ण होता.

फलंदाजी करताना वेदना होत होत्या, पण...! प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार मिळाल्यानंतर आर्यवीर सेहवागने अशा व्यक्त केल्या भावना

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत आर्यवीर सेहवागकडून फार अपेक्षा होत्या. खासकरून अंतिम फेरीत आणि तेही