Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या! गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे दोन दिवस वाहतुकीत बदल; 'या' मार्गांवर नो-पार्किंग

त्यामुळे या दोन दिवसांत घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांनी प्रवासाचे नियोजन करूनच बाहेर पडावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.












पुणे :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रविवारी आणि सोमवारी म्हणजेच 2 दिवस शहरातील काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी वाहनांच्या पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी हे बदल केले आहेत. त्यामुळे या दोन दिवसांत घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांनी प्रवासाचे नियोजन करूनच बाहेर पडावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.


पुणे जिल्हा परिषद परिसरात आयोजित कार्यक्रमासाठी दोराबजी मॉल ते हॉटेल ब्लू नाईल चौक हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांसाठी एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलीस आयुक्तालय परिसर, इस्कॉन मंदिर आणि ब्लू नाईल चौक येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.






या प्रमुख रस्त्यांवर पार्किंग बंद


रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी लोहगाव हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता आणि रामवाडी ते मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीपर्यंतच्या मार्गावर वाहनांना पार्किंग करता येणार नाही. याशिवाय कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोड, जहांगीर हॉस्पिटल चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, नेहरू मेमोरियल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक आणि फर्ग्युसन रस्त्यावरही पार्किंगला बंदी असेल.


तसेच खुडे चौक, संगमवाडी ते येरवड्यातील शाहदावलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता आणि 509 चौक ते लोहगाव हवाई दलाचा तळ या मार्गांवरही वाहने उभी करता येणार नाहीत.



सोमवारी वाहतुकीत विशेष बदल


सोमवारी सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हॉटेल आणि भरत नाट्य मंदिर परिसरात पार्किंगला मनाई असेल.


याशिवाय सकाळी 7 वाजल्यानंतर किराड चौक ते नेहरू मेमोरियल हॉल चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांनी किराड चौकातून जीपीओ मार्गे हॉटेल ब्लू नाईल चौकाकडे जावे आणि पुढे आपल्या इच्छित ठिकाणी जावे, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुणेकरांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.






Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल; पहाटे आणि रात्री गारवा वाढला, पुढील काही दिवस कसे असेल हवामान?

Maharashtra Weather : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील हवामानात हळूहळू बदल होताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलला FDA चा दणका; परवाने निलंबित!

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी पुण्यातील दोन प्रसिद्ध उपाहारगृहे, हॉटेल वैशाली आणि हॉटेल रुपाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली होणार मंत्री नितेश राणे यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव खासगी बस पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली; एकाचा मृत्यू, तर 20 जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर एका भीषण अपघाताची थरारक घटना समोर आली

बंगालच्या उपसागरात 'अक्वान' चक्रीवादळाची शक्यता; उत्तरेकडून थंड वारे! महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट की कडाक्याची थंडी?

मुंबई : राज्यात एकीकडे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची चाहूल लागत असतानाच, दुसरीकडे बंगालच्या

शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं मोठं गिफ्ट! 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने'ला वेग, 25 मतदारसंघांत सह- अध्यक्षांची नियुक्ती!