
मुंबई: अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री (14 नोव्हेंबर 2026) दोन विमानांमध्ये टक्कर झाली. यामध्ये यूपीएस कंपनीचे बोईंग 767 मालवाहू विमान आणि कोपा एअरलाइन्सचे बोईंग 737 प्रवासी विमान या दोन प्रवासी विमानांमध्ये टक्कर झाली. पनामा सिटीहून आलेले कोपा एअरलाइन्सचे प्रवासी विमान विमानतळावर पुढे जात असताना त्याचा पंख UPSच्या मालवाहू विमानाच्या पुढील भागाला धडकला. या विमानाच्या किरकोळ अपघातामध्ये, दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले असून सुदैवाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. सध्या घटनेची विमानतळ प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.
SpaceX : अंतराळ क्षेत्रात स्पेसएक्सने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एलॉन मस्क यांच्या कंपनीचे स्टारशिप अंतराळयान 22 तासांचा प्रवास पूर्ण करून ...
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, विमान धावपट्टीवर असताना कोपा एअरलाइन्सच्या बोइंग 737 विमानाचे पंख यूपीएसच्या बोइंग 767 विमानाला धडकले. रात्री 09.15 च्या सुमारास झालेल्या या धडकेत दोन जण जखमी झाल्याची माहिती, विमानतळाचे कम्युनिकेशन डायरेक्टर ग्रेग चिन यांनी CNN ला दिली. "आमचं विमान मियामी विमानतळावर लँडिंग झाल्यानंतर आम्ही टॅक्सीची वाट पाहत होतो. त्याच दरम्यान, दोन विमानांची एकमेकांना जोरदार धडक झाली आणि या घटनेमुळे विमानतळावरील लोकं ओरडू लागले. त्यामुळे परिसरामध्ये गोंधळ निर्माण झाला. या विमान दुर्घटनेमध्ये विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.", अशी माहिती कोपा एअरलाइन्सची प्रवासी सेझार फरेरा यांनी CNN ला दिली.
मियामी विमानतळावर दोन विमानांची धडक! प्रवासी विमान आणि कार्गो प्लेनची टॅक्सीवेवर टक्कर . . #prahaarnewsline #marathinews #MiamiAirport #PlaneCollision #RunwayIncident https://t.co/g63TxAw0RA
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) November 15, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, कॅबिनच्या आतमध्ये विमान अचानक एका बाजूला झुकल्याचे जाणवल्यामुळे सुरुवातीला विमानातील अनेक प्रवासी घाबरले, पण क्रूने तत्परतेने विमान आहे त्या परिस्थितीमध्ये जागेवरच थांबवले. त्यामुळे सुदैवाने मोठी जिवितहानी टळली. "हवाई वाहतूक नियंत्रकांनी UPS च्या क्रूला कोपा विमानाला मार्ग देण्यास सांगितले होते. एजन्सीकडून या अपघाताची चौकशी केली जात आहे.", अशी माहिती FAA ने दिली आहे. काय घडले हे निश्चित करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत मिळून एकत्र काम करत असल्याची माहिती यूपीएसने दिली आहे. दुसरीकडे, कोपा एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे, "घडलेल्या घटनेमुळे आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हिच आमची प्राथमिकता आहे. आम्ही कायमच तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू."
इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी त्यांना ब्रिटिश नागरिकत्व मिळाले ...




