Sunday, November 15, 2026

IndiGo Emergency Landing: हवेतच विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड; पुणे विमानतळावर इंडिगोचे इमर्जन्सी लँडिंग

पुणे विमानतळावर रविवारी पुण्याहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या 192 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाने आपत्कालीन लँडिंग केले. उड्डाणानंतर अवघ्या काही वेळातच वैमानिकाने विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

IndiGo Emergency Landing: पुणे विमानतळावर रविवारी पुण्याहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या 192 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाने आपत्कालीन लँडिंग केले. उड्डाणानंतर अवघ्या काही वेळातच वैमानिकाने विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, लँडिंग गिअर (विमानाची चाके) आत न गेल्याने, तांत्रिक बिघाडामुळे विमानाची चाके बाहेरच राहिली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे विमानतळावर फ्लाईट 6E 0623 (VT-IZE) सकाळी 9:4 वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आली. त्यातून सर्व प्रवासी आणि कर्मचारी सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. (Landing Gear Failure)

अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली. वैमानिकाने दिलेल्या इशाऱ्यानंतर, पुणे विमानतळ प्रशासनाने हवाई वाहतूक नियंत्रण (ATC), इंडिगो आणि इतर संस्थांशी समन्वय साधला. त्यानंतर भारतीय हवाई दलाने तातडीने संपूर्ण आणीबाणी जाहीर केली. तसेच अग्निशमन सेवा, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांना सतर्कतेचा इशारा दिला. (Flight Diversion News)

खबरदारीचा उपाय म्हणून, विमान खाली उतरण्यापूर्वी लँडिंग गिअरची प्रत्यक्ष पाहणी करता यावी यासाठी धावपट्टीवरून कमी उंचीवरून (लो पास) एक फेरी मारण्यात आली. विमान उतरल्यानंतर तीन अग्निशमन वाहनांनी त्याला संरक्षण दिले तसेच दोन रुग्णवाहिकांच्या मदतीने विमानाला सात क्रमांकाच्या बेपर्यंत नेण्यात आले. त्यानंतर विमानाला एरोब्रिज जोडण्यात आला आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. प्रवाशांचा पुढील प्रवास खोळंबू नये, यासाठी इंडिगोकडून बेंगळुरूहून पर्यायी विमान पुण्यात आणण्याची व्यवस्था करण्यात आली. या विमानातून प्रवाशांना गुवाहाटीला रवाना केले जाणार आहे. तसेच विमान सुरक्षितपणे उतरले याची खात्री केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे असे समजल्यावर, सकाळी 9:10 वाजता संपूर्ण आणीबाणी मागे घेण्यात आली. या सर्व घटनांमध्ये विमानात असलेल्या 192 लोकांपैकी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.  तसेच घटनेदरम्यान प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >