Sunday, November 15, 2026

Fire News: पनवेलच्या स्टील मार्केटमध्ये भीषण आग! थिनरच्या ड्रमचा मोठा स्फोट, अग्निशमन जवान जखमी

नवी मुंबईमधील पनवेल परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबोली येथील स्टील मार्केटमधील एका गॅरेज आणि गोदामाला भीषण आग लागली आहे. स्टील मार्केट परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. परंतु आग विझवताना मोठा स्फोट झाला. या घटनेत एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाला असून, जागेचा मालक सध्या फरार आहे. सदर घटना रविवारी घडली आहे.

Panvel Fire News: नवी मुंबईमधील पनवेल परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबोली येथील स्टील मार्केटमधील एका गॅरेज आणि गोदामाला भीषण आग लागली आहे. स्टील मार्केट परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. परंतु आग विझवताना मोठा स्फोट झाला. या घटनेत एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाला असून, जागेचा मालक सध्या फरार आहे. सदर घटना रविवारी घडली आहे.

जखमी अग्निशमन जवानाला सत्यम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर नागरिकाला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. यासंदर्भात, उप अग्निशमन अधिकारी मनीष ब्रह्मंकर यांनी सांगितले की, त्यांना सुरुवातीला एका दुकानात आग लागल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी "रात्री सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास, नियंत्रण कक्षाला एका दुकानात आग लागल्याचा फोन आला होता. त्या माहितीच्या आधारे आम्ही तात्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी पोहोचल्यावर आमच्या लक्षात आले की, आग दुकानात नसून एका गॅरेज आणि गोदामात लागली होती." ( Kalamboli Steel Market Fire)

तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार, गोदामात कोणती रसायने साठवली आहेत याची अग्निशमन दलाला आधी कल्पना नव्हती. "अचानक एक मोठा स्फोट झाला. नंतर आम्हाला समजले की, आत ठेवलेल्या थिनरच्या अनेक ड्रममुळे हा स्फोट झाला आहे. या स्फोटात आमचा एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाला आहे. तो 5 ते 6 टक्के भाजला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.", असे उप अग्निशमन अधिकारी मनीष ब्रह्मंकर यांनी माहिती देताना सांगितले. (Garage Fire Incident)

दरम्यान, घटनेपासून गोदामाचा आणि गॅरेजचा मालक बेपत्ता झाला आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Kalamboli Breaking News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >