मुंबई: भारतात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या संस्कृतीच्या जतनासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंती निमित्त आयोजित 'जनजातीय गौरव दिवस' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तब्बल 3000 कोटी रुपयांच्या 246 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे. आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या या प्रकल्पांमुळे देशातील आदिवासी क्षेत्राचे चित्र पालटणार आहे. यात 38 एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) आणि पीएम-जन्मन (PM-JANMAN) अंतर्गत 100 बहुउद्देशीय केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आणखी 19 नवीन एकलव्य शाळांची पायाभरणीही यावेळी करण्यात आली आहे.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; गडचिरोलीला विकासाच्या नकाशावर पहिल्या क्रमांकावर आणणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
गडचिरोली: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात जनजातीय गौरव दिवस साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी ...
एकूण प्रकल्पांपैकी, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 173 उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहेत. ही केंद्रे अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी आणि विविध समुदाय- स्तरीय उपक्रमांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून काम करतील. मोदींच्या हस्ते, पीएम-जनमन आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA) अंतर्गत इतर विविध प्रकल्पांचे उद्घाटनही करणार आहेत. उद्घाटन होणाऱ्या इतर प्रमुख प्रकल्पांमध्ये आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन करण्याच्या उद्देशाने अरुणाचल प्रदेशातील इटानगरमध्ये आदिवासी संशोधन संस्था (TRI) इमारत आणि मिझोरममधील ऐझॉल येथील 'रोपुइलियानी आदिवासी स्वातंत्र्यसेनानी संग्रहालय' यांचा समावेश आहे. हे संग्रहालय मिझो जमातीच्या स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य, पराक्रम आणि त्याग यांचे स्मरण करते, तसेच मिझो लोकांच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि परंपरेचे प्रदर्शन करते.
Birsa Munda Jayanti 2026: गडचिरोलीतून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल! 'पूर्वी परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे उत्सव'
Birsa Munda Jayanti 2026: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात जनजातीय गौरव दिवस साजरा केला जात आहे. या निमित्ताने ...
पंतप्रधानांच्या हस्ते, 19 नवीन एकलव्य मॉडेल निवासी शाळांची पायाभरणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून केंद्र सरकार आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण देणार आहे. ते आदिवासी उत्पादकांसाठी बाजारपेठ उपलब्धता मजबूत करण्यासाठी 12 आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्रांची (TMMC) पायाभरणीही करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी PM-JANMAN आणि DAJGUA अंतर्गत इतर 42 प्रकल्पांचेही भूमिपूजन करतील. हा कार्यक्रम 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान देशभरात साजरा करण्यात येणार आहे. 'जनजातीय गौरव पखवाडा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. पखवाडादरम्यान, सरकारकडून EMRS विद्यार्थ्यांसोबत संवाद, राष्ट्रीय आदिवासी साहित्य महोत्सव, आदिवासी वैद्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांसाठी (पीव्हीटीजी) आरोग्य आणि पोषण शिबिरे आणि धरती आबा जनभागीदारी अभियानांतर्गत आदिवासी गावांमध्ये समाजसेवा मोहीम यांसारख्या विविध राष्ट्रीय आणि तळागाळातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.