Maharashtra Weather : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल; पहाटे आणि रात्री गारवा वाढला, पुढील काही दिवस कसे असेल हवामान?

15 नोव्हेंबर रोजी उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असली, तरी महाराष्ट्रात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.

Maharashtra Weather : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील हवामानात हळूहळू बदल होताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर राज्यातील तापमानात घट झाली असून अनेक भागांत गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा वाढला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानात घट होत आहे. दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असली, तरी महाराष्ट्रात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.


कोकण विभागात हवामान कोरडे आणि काहीसे उष्ण राहण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. काही ठिकाणी सकाळच्या वेळी धुके पाहायला मिळण्याची शक्यता आहे.






उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. या भागात रात्री आणि पहाटे थंडीचा जोर वाढत असून किमान तापमान 16 अंशांपर्यंत खाली येऊ शकते. तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.


पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही थंडीचा अनुभव येत आहे. दिवसा हवामान कोरडे राहणार असून कमाल तापमान 28 अंश आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात किमान तापमान 14 अंशांपर्यंत नोंदवले जात आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री नागरिकांना थंडी जाणवत आहे.


मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतही कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 22 अंशांच्या आसपास राहू शकते. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि इतर जिल्ह्यांतही पावसाची शक्यता नाही. या भागात कमाल तापमान 30 अंश आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.


एकूणच, राज्यात पुढील 3 ते 4 दिवस थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारवा असे बदलते वातावरण अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार आरोग्याची काळजी घ्यावी.

Comments
Add Comment

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलला FDA चा दणका; परवाने निलंबित!

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी पुण्यातील दोन प्रसिद्ध उपाहारगृहे, हॉटेल वैशाली आणि हॉटेल रुपाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली होणार मंत्री नितेश राणे यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव खासगी बस पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली; एकाचा मृत्यू, तर 20 जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर एका भीषण अपघाताची थरारक घटना समोर आली

बंगालच्या उपसागरात 'अक्वान' चक्रीवादळाची शक्यता; उत्तरेकडून थंड वारे! महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट की कडाक्याची थंडी?

मुंबई : राज्यात एकीकडे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची चाहूल लागत असतानाच, दुसरीकडे बंगालच्या

शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं मोठं गिफ्ट! 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने'ला वेग, 25 मतदारसंघांत सह- अध्यक्षांची नियुक्ती!

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक, रविवारची स्थिती काय?

पालघर: पश्चिम रेल्वेवर येत्या शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे