
पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये झालेल्या काँग्रेसच्या भारत शिखर परिषदेवरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. सध्या केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी पुणेकरांना संबोधतांना शाह म्हणाले की, राहुल गांधींनी देशाची बदनामी केली आहे. जर राहुल यांना जिंकायचे असेल, तर त्यांनी परदेशात न जाता खेड्यापाड्यामध्ये जाऊन नागरिकांना भेट द्यायला हवी. यावेळी अमित शाह यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनाही एक संदेश दिला. अमित शाह म्हणाले की, काँग्रेस पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राजकीय पराभवाचा सामना करत आहे. या नैराश्यातूनच काँग्रेस वेगवेगळ्या प्रकारे आपली नाराजी व्यक्त करत असल्याची टीका अमित शाह यांनी केली.
Assembly Elections 2026 : देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका ...
मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही
फरिदाबाद येथे आयोजित कार्यक्रमात देशभरातून लोकांना बोलावण्यात आले होते. राहुल गांधीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी भारतविरोधी वक्तव्ये करून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमित शाह यांनी केला. अमित शाह म्हणाले, "आज मी या व्यासपीठावरून महाराष्ट्रातील आणि देशभरातील लोकांना हे सांगायला आलो आहे की, जिथे कुठे काँग्रेसचे नेते दिसतील, त्यांना विचारा की निवडणूक लढणे, हरणे किंवा जिंकणे हे पक्षाच्या नेत्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते का? तुम्हाला 10 वर्षांची संधी देण्यात आली, पण तुम्ही 12 लाख कोटी रुपयांचा घोटाळा आणि भ्रष्टाचार केला. देशातील जनतेने तुमचा हात धरून तुम्हाला थेट केंद्रातूनच बाहेर काढले. त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलं. 12 वर्षांत नरेंद्र मोदींवर एका पैशाच्या भ्रष्टाचाराचाही आरोप झालेला नाही."
मुंबई: भारतात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या संस्कृतीच्या जतनासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या ...
मोदींच्या कार्यकाळात देशाने प्रगती केली
पुणेकरांना संबोधताना अमित शाह पुढे म्हणाले की, "कृषी क्षेत्र असो, औद्योगिक विकास असो, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणे असो, स्टार्टअप इकोसिस्टम तयार करणे असो, रेल्वेचे पुनरुज्जीवन करणे असो, विमानतळांची संख्या 76 वरून 150 पर्यंत वाढवणे असो, सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क उभारणे असो, नवीन शिक्षण धोरण आणणे असो किंवा सहकार मंत्रालयाची निर्मिती करणे असो, या सर्व गोष्टी गेल्या 12 वर्षांत घडल्या आहेत.
तुम्हाला सत्ता हवीये का? मग तुम्ही...
अमित शाह यांनी भर सभेतून राहुल गांधी यांना एक महत्त्वाचा सल्ला सुद्धा दिला आहे. अमित शाह सल्ला देताना म्हणाले की, "मला राहुल गांधींना सल्ला द्यायचा आहे की, अशा आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताची बदनामी करून तुम्हाला सत्ता मिळणार नाही. जर तुम्हाला सत्ता हवी असेल, तर परदेश दौरे करणे थांबवा आणि देशातील प्रत्येक खेड्यापाड्यांना, तळागाळातील गावांना भेटी द्यायला सुरुवात करा. मग तुम्ही कदाचित सत्तेमध्ये येऊ शकाल. जग नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा करत असतानाही, तुम्ही मोदी आणि भारताच्या विकासाच्या प्रवासाला बदनाम करण्याचे काम करत आहात. तुम्ही ऐकणार नाही, पण मला काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगायचे आहे की, जर तुम्ही याच दिशेने त्यांचे अनुकरण केले, तर पुढील 30 वर्षे तुम्हाला संधी मिळणार नाही."
छत्रपती संभाजीनगर : आज छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी विविध राजकीय घडामोडींवर आणि स्थानिक ...
केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले, "मला सांगा, सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी पक्ष, तुम्ही आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताची किंवा भारताच्या पंतप्रधानांची बदनामी करू शकता का? संपूर्ण देशाला वाटते की राहुल गांधींनी जमिनीवर यावे आणि गावांना भेट द्यावी. पण मला माहित आहे की तुम्ही थोड्या दिवसांतच परदेशामध्ये जाऊन स्थायिक होणार आहेत. अशा प्रकारे तुमची सत्तेची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत, भारताची विकासगाथा, भारताची लोकशाही आणि भारतीय पंतप्रधानांची बदनामी करण्याच्या राहुल गांधींच्या प्रयत्नाचा मी तीव्र निषेध करतो. मी भारताच्या जनतेलाही आवाहन करतो की त्यांनी आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला जोरदार प्रत्युत्तर द्यावे."





