UAE Accident : UAE मधील भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू; चार भारतीयांचा समावेश

गुजरातमधील एका 13 वर्षीय मुलाचाही या अपघातात मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे झालेल्या या अपघातात ट्रकसह 23 वाहनांचा समावेश होता.

UAE Accident: संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) फुजैरा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार भारतीय नागरिकांचा समावेश असून, त्यापैकी केरळमधील एकाच कुटुंबातील तीन सदस्य आहेत. गुजरातमधील एका 13 वर्षीय मुलाचाही या अपघातात मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे झालेल्या या अपघातात ट्रकसह 23 वाहनांचा समावेश होता. या दुर्घटनेत 30 जण जखमी झाले आहेत. ( Fujairah Road Accident)





मृतांमध्ये केरळमधील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश


UAE च्या गृह मंत्रालयाने शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर मृतांची ओळख जाहीर केली. त्यानुसार, मृतांमध्ये 10 UAE नागरिक आणि चार भारतीयांचा समावेश आहे.


केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा येथील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी मृतांची नावे मोहम्मद अस्मिल, त्यांची जुळी बहीण मिसना झुबिन आणि तीन वर्षांचा भाचा मोहम्मद फय्याश अशी असल्याचे सांगितले.


या अपघातात गुजरातमधील 13 वर्षीय आतिफ मोहम्मद इम्रान मन्सूर याचाही मृत्यू झाला. तो कुटुंबासोबत भारतात परतण्यासाठी फुजैरा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होता. या दुर्घटनेत त्याचे आई-वडील आणि मोठी बहीण जखमी झाले असून, तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





सात भारतीयांसह 30 जण जखमी


UAE च्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात एकूण 30 जण जखमी झाले. यामध्ये आठ UAE नागरिक, दोन जॉर्डनचे, सात भारतीय, दोन पाकिस्तानी, तीन इजिप्शियन, सहा ओमानचे आणि दोन ब्राझिलियन नागरिकांचा समावेश आहे.


दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्याने फुजैरामधील रुग्णालयांना भेट देऊन जखमी भारतीयांची विचारपूस केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. पीडित कुटुंबांना आवश्यक ती मदत दिली जात असल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले.



दोन अपघातांमुळे 23 वाहनांची धडक


UAE च्या सार्वजनिक अभियोजन विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, शेख खलिफा बिन झायेद रोडवर एकापाठोपाठ दोन अपघात झाले. पहिल्या घटनेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला एका वाहनाने धडक दिली.


दुसऱ्या घटनेत दोन मालवाहू कंटेनर घेऊन जाणाऱ्या ट्रकची अनेक वाहनांना धडक बसली. या धडकेनंतर ट्रक उलटला. रस्त्याच्या या भागात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने उजवी लेन बंद होती. या अपघातातील ट्रक चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याला अंशतः कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

Israel Hamas Conflict : 7 ऑक्टोबर हल्ल्याचा सूत्रधार संपवला? इस्रायलच्या कारवाईने हमास हादरला

जेरुसलेम : मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून इस्रायली लष्कराने हमासला सर्वात मोठा धक्का दिला

Miami Airport: अमेरिकेतील मियामी विमानतळावर दोन विमान एकमेकांना धडकली, 2 प्रवासी जखमी; नेमकं काय घडलं?

मुंबई: अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री (14 नोव्हेंबर 2026) दोन विमानांमध्ये टक्कर झाली.

SpaceX Video : एलॉन मस्क यांच्या SpaceX ने रचला नवा इतिहास! अंतराळातून वेगात परतणारं Starship हवेतच पकडलं

SpaceX : अंतराळ क्षेत्रात स्पेसएक्सने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एलॉन मस्क यांच्या कंपनीचे स्टारशिप

Lalit Modi British Citizenship: आयपीएलचे संस्थापक ललित मोदी झाले ब्रिटिश नागरिक, ऑक्सफर्ड युनियनमध्ये केली घोषणा

इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी

US flight delays : अमेरिकेत विमानसेवा विस्कळीत! हजारो उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल; तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ

US flight delays : अमेरिकेतील विमान प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या

अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या भारतीय तरुणाला 30 वर्षांची शिक्षा, अल्पवयीन सांगून करायचा ब्लॅकमेल

ब्रिटन: ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या 27 वर्षीय भारतीय वंशाच्या बिलाल काझी या तरूणाला अल्पवयीन मुलींना आपल्या