भारतात कधी होणार वर्ल्डकप?
आयसीसीने 12 स्पर्धांची घोषणा केली असली तरी भारतात कोणत्या स्पर्धा होणार? याची उत्सुकता आहे. भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी 2030 आणि वनडे वर्ल्डकप 2031 स्पर्धा होणार आहे. या दोन्ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2030चं आयोजन 9 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान होईल. वनडे वर्ल्डकप 2031 स्पर्धा 9 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान होील. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतासोबत बांगलादेशकडे यजमानपद असेल.
| वर्ष | स्पर्धा | यजमान | तारीख |
|---|---|---|---|
| 2028 | टी20 विश्वचषक | ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड | 12 ऑक्टोबर – 12 नोव्हेंबर |
| 2029 | डब्ल्यूटीसी फायनल्स | इंग्लंड | 8 ते 12 जून |
| 2029 | चॅम्पियन्स ट्रॉफी | भारत | 9 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर |
| 2030 | टी20 विश्वचषक | इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंड | 4 जुलै ते 4ऑगस्ट |
| 2031 | डब्ल्यूटीसी फायनल्स | इंग्लंड | जून |
| 2031 | एकदिवसीय विश्वचषक | भारत, बांगलादेश | 9 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर |
| 2032 | टी20 विश्वचषक | (अद्याप ठरलेले नाही) | ऑक्टोबर 14 नोव्हेंबर 14 |
| 2033 | डब्ल्यूटीसी फायनल्स | (अद्याप ठरलेले नाही) | जून |
| 2033 | चॅम्पियन्स ट्रॉफी | (अद्याप ठरलेले नाही) | ऑक्टोबर |
| 2034 | टी20 विश्वचषक | (अद्याप ठरलेले नाही) | जुलै 6 ते ऑगस्ट 6 |
| 2035 | डब्ल्यूटीसी फायनल्स | (अद्याप ठरलेले नाही) | 7 जून ते 11 जून |
| 2035 | एकदिवसीय विश्वचषक | (अद्याप ठरलेले नाही) | 2 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर |
आयसीसीचे मुख्य कार्यकारी संजोग गुप्ता म्हणाले की, "आयसीसीच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचा संच हा जागतिक क्रिकेट पायाभूत संरचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते खेळाला अधिक स्पर्धात्मक बनवतात आणि संपूर्ण क्रिकेट जगताला एक चांगली दिशा व संदर्भ प्रदान करतात." संजोग गुप्ता पुढे म्हणाले की, "खेळाडू आणि सदस्य देशांना या स्पर्धांविषयी सुयोग्य माहिती देण्याचे महत्त्व आम्ही जाणतो. यामुळे खेळाडूंचा विकास, उच्च-कार्यक्षमता कार्यक्रम आणि एक पद्धतशीर क्रिकेट वेळापत्रक यासाठी उत्तम योजना तयार करण्यास मदत होईल."