मंत्री नितेश राणे यांच्याकडून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा आढावा; 22 योजनांच्या अंमलबजावणीवर भर

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. योजनेसाठी १,२४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून, अधिकाधिक मच्छीमारांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी जिल्हानिहाय नियोजन आणि जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करून तिचा लाभ अधिकाधिक मच्छीमारांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा. पालकमंत्री, जिल्हा नियोजन अधिकारी आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून जिल्हानिहाय नियोजन करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी ऑनलाईन आढावा बैठकीत केले. या योजनेंतर्गत १ हजार २४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. दुष्काळी परिस्थितीत या निधीचे योग्य नियोजन करून तो प्रभावीपणे खर्च केल्यास मच्छीमारांना मोठा लाभ होईल. तसेच मत्स्यव्यवसायाला चालना मिळून जिल्ह्याच्या अर्थकारणासह उत्पन्नवाढीलाही हातभार लागेल, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.


मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ प्रत्येक मच्छिमारापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. या योजनांसाठी मंजूर असलेल्या १,२४० कोटी रुपयांच्या निधीचा प्रभावी विनियोग करून राज्यातील मच्छिमार बांधवांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे आपले उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे. योजनांची माहिती प्रत्येक मच्छिमार आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. जिल्ह्याच्या गरजेनुसार नियोजन करून आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करावेत.






योजनेसाठी आतापर्यंत ४३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे, नागपूर आणि बीड जिल्ह्यांतून अर्जांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांतील अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याची बाब त्यांनी अधिक-यांसमोर मांडली. योजना नवीन असल्यामुळे जिल्हास्तरावर व्यापक जनजागृती करावी. संभाव्य लाभार्थ्यांचे स्थानिक सर्वेक्षण करून अधिकाधिक मच्छीमारांना महाडीबीटीच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करावे. प्रत्येक जिल्ह्यातील संभाव्य लाभार्थी आणि आवश्यक निधीचा प्राथमिक अंदाज मत्स्यव्यवसाय विभागाने जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दिला आहे.


स्थानिक गरज, लाभार्थ्यांची संभाव्य संख्या आणि जिल्हा नियोजन समितीचा अर्थसंकल्प विचारात घेऊन साधारण चार ते दहा कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करण्याचे नियोजन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मागील पाच वर्षांतील मत्स्य क्षेत्रावरील खर्चाचा आढावा घेऊन या क्षेत्रातील वार्षिक खर्चात किमान दहापट वाढ साधण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. योजनेच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी विभागातील अधिकारी कायम उपलबजिल्हाधिकारीत्स्यव्यवसाय विभागाचे जिल्हास्तरीय अधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांशी सातत्याने संपर्क ठेवून अर्ज, निधी उपलब्धता आणि अंमलबजावणीचा पाठपुरावा करावा असेही राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Chipi Airport: चिपी-नवी मुंबई विमानसेवेला 16.74 कोटींचे ‘व्हीजीएफ’ अनुदान

मुंबई(सुहास शेलार): सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा चालविणाऱ्या ‘जस्ट उडो एव्हिएशन

Zilla Parishad: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील आरक्षणाच्या 'रोटेशन'चा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला दिलासा

मुंबई(सुहास शेलार): जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या

मतदारसंघ आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! राखीव जागांच्या फेरबदलाचा अधिकार राज्य सरकारकडे

एखादा विशिष्ट मतदारसंघ अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी राखीव असावा, असा हक्क कोणत्याही मतदाराला किंवा

ST Bus : रात्रीच्या अंधारात दोन अल्पवयीन मुलींना बसमधून उतरवले; चालक आणि वाहक निलंबित

Maharashtra News: एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावर उतरवल्याच्या

Raigad Fire : उरणमध्ये तेल निर्मिती प्रकल्पाला भीषण आग; आकाशात धुराचे लोट, सिडको अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

Uran : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरणजवळील वेश्वी गावात सोमवारी एका औद्योगिक गोदामाला भीषण आग लागल्याची

Chipi Airport : चिपी विमानतळ आता पुन्हा बंद पडणार नाही- मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सिंधुदुर्ग : दोन वर्षांच्या खंडानंतर चिपी विमानतळावरून नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा सोमवारी पुन्हा सुरू