Gondia Crime: गोंदियात इंडिगो एअरलाईन्सच्या महिला कर्मचाऱ्याचा गूढ मृत्यू; जंगलात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील बोंद्रानी वनक्षेत्रात पुणे विमानतळावर इंडिगो एअरलाईन्समध्ये कार्यरत असलेल्या ३५ वर्षीय वर्षा तुरकर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांच्यासोबत असलेल्या मैत्रिणीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात रविवारी एका वनक्षेत्रात एका खासगी देशांतर्गत विमान कंपनीत नोकरी करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह गूढ परिस्थितीत आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी (१६ नोव्हेंबर) दिली. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वर्षा तुरकर नावाची महिला दवानीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोंद्रानी वनक्षेत्रात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिच्यासोबत घटनास्थळी गेलेल्या आणि दरोडेखोरांच्या एका गटाने आपल्यावर हल्ला केल्याचा दावा करणाऱ्या तिच्या मैत्रिणीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.


पीडित महिला पुणे विमानतळावर इंडिगो एअरलाइन्समध्ये काम करत होती. पोलिसांनी सांगितले की, तिचे लग्न २०२४ मध्ये झाले असून तिला अडीच वर्षांची मुलगी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपास सुरू केला. अज्ञात व्यक्तींना हल्ला आणि दरोडा टाकल्याच्या दाव्यांची पोलिसांकडून पडताळणी केली जात असून मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन अहवाल महत्वाचा ठरेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.






पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आले की, तुरकर दिवाळीच्या दिवशी आपल्या मुलीसोबत बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी तालुक्यात असलेल्या आपल्या मूळ गावी गेल्या होत्या. शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, त्या महिला महाराष्ट्र- मध्य प्रदेश सीमेजवळील वैनगंगा नदीच्या काठावर मित्र नितेश अग्रवाल यांना भेटण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. काही तासांनंतर नितेशने त्या महिलेच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केल्याचे सांगितले. जेव्हा तुरकरचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना आढळली. तिला तातडीने खैरलांजी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिला मृत घोषित केले.


पोलिसांनी सांगितले की, अग्रवालने महिलेच्या कुटुंबियांना सांगितले की, बुरखा घातलेल्या अज्ञात लोकांच्या एका गटाने तिला लुटण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला केला. मात्र या हल्ल्यात अग्रवाल जखमी झाले नाही असे पोलिसांनी सांगितले. तसेच घटनेचा क्रम जाणून घेण्याचे आणि त्या व्यक्तीच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेदेखील पोलिसांनी सांगितले. खैरलांजी येथील आरोग्य केंद्रात महिलेला मृत घोषित करण्यात आल्याने अपघाती मृत्यू अहवाल दाखल करण्यात आला असून प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

केंद्र सरकारच्या सेवेत नोकरीची संधी! यूपीएससीमार्फत 'गट अ'च्या 13 पदांसाठी भरती; 4 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये थेट भरतीद्वारे नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध

‘जिजाई’मध्ये किशोर कदम साकारणार दमदार पोलिस इन्स्पेक्टर; रिंकू राजगुरूच्या चित्रपटाची उत्सुकता वाढली!

Jijai Marathi Movie : झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटातून नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून

मतदारसंघ आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! राखीव जागांच्या फेरबदलाचा अधिकार राज्य सरकारकडे

एखादा विशिष्ट मतदारसंघ अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी राखीव असावा, असा हक्क कोणत्याही मतदाराला किंवा

महिला डायरेक्टरला 'आळशी' म्हणणं कंपनीला पडलं महागात; रोजगार न्यायालयाचा मोठा निर्णय

Danny Luo Unfair Dismissal Case: यूकेमधील एका एआय कंपनीने एका महिला डायरेक्टरला तिच्या सहकारी संचालकांनी 'अत्यंत आळशी' म्हणत

Nashik : डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड ! नीलेश जेजूरकर आणि स्वाती चव्हाण यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल

नाशिक : डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर

Election 2027: पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला निवडणुकांचा धुरळा! उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यात होणार मतदान

वर्ष 2027 हे निवडणुकांचं वर्ष असणार आहे. कारण या वर्षात सात राज्यात निवडणुका होणार आहे. पण वर्षाच्या सुरूवातीला पाच