Monday, November 16, 2026

Pune Crime News : दिवाळीला माहेरी गेली, पण वैनगंगा नदीच्या जंगलात तिचा मृतदेह सापडला; एअरलाईनमध्ये काम करणाऱ्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

च्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पुणे: पुणे विमानतळावर खासगी विमान कंपनीच्या तिकीट काउंटरवर काम करणाऱ्या 35 वर्षीय वर्षा तुरकर हिचा मध्य प्रदेशातील गोंदिया जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी ती एका निर्जन जंगल परिसरात गंभीर जखमी अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमागे घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लुटमारीचा दावा, मित्राची चौकशी सुरु 

वर्षासोबत असलेल्या नरेश अग्रवाल याने पोलिसांना दिलेल्या जबाबात, मुखवटे घातलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करून 40 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने लुटल्याचा दावा केला आहे.

नरेशच्या म्हणण्यानुसार, ते दोघे घटनास्थळाजवळ गाडीतून उतरून बोलत असताना तीन अज्ञात व्यक्ती तिथे आले. त्यांनी लुटमारीचा प्रयत्न केला आणि त्यापैकी एकाने वर्षावर चाकूने हल्ला केला. मात्र, त्याच्या जबाबाबाबत पोलिसांना संशय असल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

वर्षाच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार

मिळालेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबरच्या संध्याकाळी वर्षाच्या पाठीवर धारदार शस्त्राने चार वार करण्यात आले होते. गंभीर जखमी अवस्थेत तिला खैरलांजी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दिवाळीसाठी मुलीसह माहेरी गेली होती

वर्षा तुरकर पुण्यातील धानोरी परिसरात राहत होती. ती पुणे विमानतळावर खासगी विमान कंपनीच्या तिकीट काउंटरवर कार्यरत होती. दिवाळी साजरी करण्यासाठी ती आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील नवेगाव किन्ही येथे माहेरी गेली होती.

तिला रविवारी पुन्हा पुण्यात परतायचे होते. मात्र, त्याच्या आदल्या दिवशीच तिच्यावर हल्ला झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, लुटमारीच्या दाव्यातील सत्यता आणि या घटनेत अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >