Vivek Vihar house collapse : दिल्लीत मोठी दुर्घटना! विवेक विहारमध्ये जुन्या घराची छत कोसळली; अनेक जण मलब्याखाली अडकल्याची भीती

दिल्लीतील विवेक विहार (Vivek Vihar) भागात एका जुन्या दुमजली (Ground + 2) घराची छत अचानक कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे. या दुर्घटनेत काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीतील विवेक विहार (Vivek Vihar) भागात एका जुन्या दुमजली (Ground + 2) घराची छत अचानक कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे. या दुर्घटनेत काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.



नक्की काय घडली घटना ?






आज सकाळी साधारण साडेदहा-अकराच्या सुमारास हा अपघात झाला. घर जुने असल्यामुळे त्याची रचना कमजोर झाली असावी, ज्यामुळे अचानक स्लॅब किंवा छत खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तात्काळ पावले उचलली.



अडकलेल्या लोकांना काढले बाहेर


घटनची माहिती मिळताच अग्निशामक दल (Fire Brigade) आणि बचाव पथकाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचावकार्य राबवून मलब्यात अडकलेल्या काही जखमी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



प्रशासन सतर्क, तपास सुरू


सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू असून पोलीस आणि आपत्कालीन पथक मलब्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेत आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments
Add Comment

Narendra Modi Philippines visit : "भविष्य स्पर्धेतून नव्हे, तर परस्पर सहकार्यातून घडले पाहिजे"; आशियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

फिलिपिन्स : आजच्या या अनिश्चित आणि बदलत्या जागतिक वातावरणात जगात शांतता, स्थैर्य आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणे

PM Modi in Manila : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मनिलातील शतकी जुन्या 'खालसा दिवाण' गुरुद्वाराच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन; पाच मजली भव्य संकुल उभारणार

मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फिलिपिन्स दौऱ्यादरम्यान मंगळवारी मनिला येथील ऐतिहासिक 'खालसा दिवाण'

Udaipur Viral Video: परदेशी यूट्यूबरकडे चुंबनाची मागणी; व्हिडिओ व्हायरल होताच आरोपीची माफी

Udaipur Viral Video: उदयपूरमधून एका थाई-फ्रेंच यूट्यूबरने रात्रीच्या लाईव्हस्ट्रीममध्ये घडलेल्या घटनेमुळे सोशल मीडियावर

Uttarakhand Accident : उत्तराखंडमध्ये दोन भीषण अपघात; बोलेरो आणि बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू, 24 जखमी

उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये दोन दिवसांत झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातांमध्ये एकूण 12 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण

चीनला घेरण्यासाठी QUAD ची मोठी रणनीती ! मनीलामध्ये मोदी, ट्रम्प, ताकाइची आणि अल्बनीज यांची महत्त्वपूर्ण बैठक

मनीला : हिंद-प्रशांत क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान

Notice to Red Bull: रेड बुलवर FSSAI ची कारवाई, 'एनर्जी ड्रिंक' लेबलवरून नोटीस

प्रसिद्ध सॉफ्ट ड्रिंक ब्रँड रेड बुलला (Red Bull) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) नोटीस बजावली आहे. रेड