कामगारांसाठी आनंदाची बातमी! शासनाच्या 29 सेवा आणि 18 योजनांची प्रक्रिया होणार अतिशय सुलभ; नवीन पोर्टल लवकरच होणार सुरू

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत येणाऱ्या 29 सेवा आणि 18 योजनांच्या शासकीय प्रक्रियेच्या पुनर्रचनेला (GPR) मान्यता देण्यात आली आहे. यामुळे कार्यालयीन फेऱ्या, कागदपत्रे आणि मंजुरीचा कालावधी कमी होणार असून, नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच एक नवीन पोर्टल कार्यान्वित केले जाणार आहे.

मुंबई : कामगार विभागाच्या सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कामगार विभागाच्या 29 सेवा आणि 18 योजनांच्या शासकीय प्रक्रिया पुनर्रचनेस (GPR) अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या नव्या सुधारणांमुळे नागरिकांच्या कार्यालयीन फेऱ्या, अर्जातील किचकट रकाने, आवश्यक कागदपत्रांची संख्या, मंजुरीचे स्तर आणि सेवा मंजुरीचा एकूण कालावधी कमी होणार आहे, अशी माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली आहे.



प्रक्रिया पुनर्रचनेला मंजुरी


मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय शासकीय प्रक्रिया पुनर्रचना समितीच्या बैठकीत कामगार विभागाच्या 29 जी-टू-बी (G2B) व जी-टू-सी (G2C) सेवा आणि 18 योजनांच्या प्रक्रिया पुनर्रचनेला अंतिम सहमती देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कामगार विभागाने शासन निर्णयाद्वारे या प्रक्रियेला औपचारिक मान्यता दिली आहे.






काय होणार बदल?


या पुनर्रचनेनुसार अर्जांची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली असून आवश्यक कागदपत्रे, मंजुरीचे विविध स्तर तसेच अंतिम सेवा मान्यतेसाठीचे दाखले आणि प्रमाणपत्रांमध्ये आवश्यक ते सुधारीत बदल करण्यात आले आहेत. या सर्व सेवा व योजनांचा लाभ नागरिकांना आणि व्यावसायिकांना अत्यंत सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र आणि अत्याधुनिक पोर्टल तयार करण्यात येत असून, ते नजीकच्या काळातच कार्यान्वित होईल. या डिजिटल सुधारणेमुळे पारदर्शकता वाढून भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होईल.

Comments
Add Comment

Ramayana: रामायणाच्या दुसऱ्या भागाआधी संत-अभ्यासकांना चित्रपट दाखवा; हिंदू संघटनांची मागणी

हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी रामायण चित्रपटासंदर्भात मुंबई

गडचिरोलीच्या विकासाचा मार्ग मोकळा! वैद्यकीय महाविद्यालयातील वन्यजीव परवानग्यांचे अडथळे दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : दुर्गम व आदिवासीबहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर

Four new talukas added to drought list: चार नवीन तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; उपसमितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीत वाढ होत असून पिंपळगाव, दिंडोशी, वाडा आणि विक्रमगड हे चार तालुके

Shirdi Five Star Hotel: शिर्डीत उभारणार ताज समूहाचे पंचतारांकित हॉटेल; फडणवीसांच्या उपस्थितीत करार!

मुंबई: शिर्डी विमानतळ परिसरातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून पंचतारांकित

Maharashtra Cabinet Decision: नक्षलवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती देणाऱ्याला दीड लाखांपर्यंत बक्षीस; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: नक्षलवाद्यांनी यापूर्वी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेली शस्त्रे शोधण्यासाठी माहिती देणाऱ्यांना आता रोख

Ashish Shelar: रोहित पवारांवर आशिष शेलारांचा घणाघात; म्हणाले, 'हे तर राजकीय नीचपणाच!'

Ashish Shelar: भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अनेक विषयावर