Crime News : वैद्यकीय उपकरणांची थकीत बिले मंजूर करण्यासाठी 7.5 लाखांची लाच मागितली, राज्य कामगार विमा योजनेचा अधिकारी अटकेत

या कारवाईनंतर साखरकर यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्यांच्या घराची झडती सुरू आहे.

Crime News: वैद्यकीय उपकरण पुरवठा करणाऱ्या कंपनीची थकीत बिले मंजूर करण्यासाठी 7.5 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य कामगार विमा योजनेतील लेखा अधिकारी आणि सहाय्यक संचालक जितेंद्र साखरकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. सापळा रचून कारवाई करताना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. या कारवाईनंतर साखरकर यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्यांच्या घराची झडती सुरू आहे.



थकीत बिलांसाठी मागितली 7.5 लाखांची लाच


ACB कडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वैद्यकीय उपकरण पुरवठा करणाऱ्या कंपनीला कार्यालयाकडून 4 फेब्रुवारी 2026 आणि 13 ऑक्टोबर 2026 रोजी एकूण 16.28 कोटी रुपयांच्या उपकरण पुरवठ्याचे कार्यादेश देण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने उपकरणांचा पुरवठा करून बिले मंजुरीसाठी कार्यालयात सादर केली होती. ( Jitendra Sakharkar)


मात्र, गेल्या सात महिन्यांपासून ही बिले प्रलंबित होती. त्यासाठी तक्रारदार संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करत होते. याचदरम्यान, बिले मंजूर झाल्यानंतर पैसे द्यावे लागतील, अशी मागणी अधिकाऱ्याने केल्याचा आरोप आहे.



50 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले


16 नोव्हेंबर 2026 रोजी संबंधित कार्यालयाकडून 7.5 कोटी रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले. त्यानंतर साखरकर यांनी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून केलेल्या कामाच्या मोबदल्यात 7.5 लाख रुपये मागितल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली. ( Corruption News)


तक्रारीच्या पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ACB ने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे 16 नोव्हेंबर रोजी 50 हजार रुपये स्वीकारताना साखरकर यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.



मोबाईल जप्त; घराची झडती सुरू


कारवाईदरम्यान आरोपी अधिकाऱ्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

Comments
Add Comment

Jijai Movie: ‘जिजाई’चा ट्रेलर पाहून बॉलिवूडही भारावलं; 20 नोव्हेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

Jijai Movie: झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा

Nashik : नाशिकच्या निफाड, सिन्नर अन् येवला तालुक्यांतील 35 गावांत 22 तास वीज पुरवठा खंडित ! पाहा कोणत्या गावांचा समावेश ?

नाशिक : रब्बी हंगामातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन सुरळीत व्हावे, तसेच दारणा धरणाचे पाणी शेवटच्या

PM Modi in Manila : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मनिलातील शतकी जुन्या 'खालसा दिवाण' गुरुद्वाराच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन; पाच मजली भव्य संकुल उभारणार

मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फिलिपिन्स दौऱ्यादरम्यान मंगळवारी मनिला येथील ऐतिहासिक 'खालसा दिवाण'

Online shopping : ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली नवा स्कॅम ! ऑर्डर न करताच घरी येतंय पार्सल, ग्राहकांनी सावध राहण्याचं सायबर पोलिसांचं आवाहन

अकोला : ऑनलाइन खरेदीचा वाढता ट्रेंड पाहता सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.

Virar Churchgate Local : धावत्या विरार-चर्चगेट लोकलमधील वादातून भिरकावलेला चाकू लागल्याने ५३ वर्षीय प्रवासी जखमी; वांद्रे स्थानकात तरुणाला अटक

मुंबई : धावत्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या वादातून एका तरुणाने भिरकावलेला चाकू चुकून दुसऱ्याच प्रवाशाला

Nashik : छठपूजेनंतर गोदाघाटाची स्वच्छता, 4.76 टन निर्माल्य संकलित

नाशिक : छठपूजा महोत्सवानंतर गोदावरी नदी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन