Nashik : छठपूजेनंतर गोदाघाटाची स्वच्छता, 4.76 टन निर्माल्य संकलित

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ जणांवर कारवाई; ७ हजार ७८० रुपयांचा दंड वसूल

नाशिक : छठपूजा महोत्सवानंतर गोदावरी नदी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत ४ टन ७६० किलो निर्माल्य व तत्सम कचरा संकलित करण्यात आला. तसेच स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ व्यक्तींवर कारवाई करून ७ हजार ७८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे व स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आयुक्त मनीषा खत्री यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त अमित रंजन व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी मोहिमेचे मार्गदर्शन केले.


छठपूजेच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील रामकुंड, नांदूर घाट व गोदावरी नदीकाठच्या परिसरात स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. विभागीय अधिकारी राहुल जाधव व विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांनी आयोजक, भाविक आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली. ध्वनिक्षेपकाद्वारे निर्माल्य नदीपात्रात न टाकता निर्माल्य कलशात जमा करणे, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळणे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.






वारंवार सूचना देऊनही १५ व १६ नोव्हेंबर रोजी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, 'नमामि गंगे' उपक्रमांतर्गत ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटच्या सहकार्याने होळकर पूल ते टाळकुटेश्वर परिसरातील घाटांची स्वच्छता करण्यात आली. लक्ष्मण कुंड, रामकुंड, निळकंठेश्वर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, तपोवन व नांदूर घाट येथे निर्माल्य, फुले, हार आणि पूजेचे साहित्य संकलित करण्यात आले. हा कचरा पुढील प्रक्रियेसाठी खत प्रकल्पावर पाठविण्यात आला.


या मोहिमेत वाहन क्रमांक एमएच १५ केसी २४०५ द्वारे १ हजार ३५० किलो, तर एमएच १५ एचएच ७९४५ द्वारे ३ हजार ४१० किलो कचरा संकलित करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ४ हजार ७६० किलो निर्माल्य व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली.मोहिमेत स्वच्छता निरीक्षक हर्षद मारू, गणेश तांबे, प्रशांत तेजाळे, मुकादम नंदू गवळी, किशोर साळवे, गंगापट्टेवाले अनिल नेटावटे, असिफ शेख यांच्यासह महापालिकेचे १८ कर्मचारी सहभागी झाले. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटचे विलास नाईकवाडे व त्यांच्या ४५ कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.



निर्माल्य कलशांचा वापर करण्याचे आवाहन


सण-उत्सवांदरम्यान निर्माण होणारे निर्माल्य नदीपात्रात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कलशांचा वापर करावा. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये चाकूने हल्ला! दोघांच्या भांडणात निष्पाप प्रवाशाच्या छातीत घुसला चाकू

मुंबई: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये वाढती गर्दी आणि त्यामुळे होणारे वाद-भांडणे आणि

Mumbai News: अफलातून मिठाईचा तुकडा ठरला जीवघेणा, मुंब्रा येथील तरुणाचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

मुंबई : मुंब्र्यात अफलातून मिठाई खाल्ल्यानंतर झुबेर अन्सारी या 35 वर्षीय व्यक्तीचा अनेक अवयव निकामी झाल्याने

Udaipur Viral Video: परदेशी यूट्यूबरकडे चुंबनाची मागणी; व्हिडिओ व्हायरल होताच आरोपीची माफी

Udaipur Viral Video: उदयपूरमधून एका थाई-फ्रेंच यूट्यूबरने रात्रीच्या लाईव्हस्ट्रीममध्ये घडलेल्या घटनेमुळे सोशल मीडियावर

BMC : आरोग्यांच्या मुद्दयावर शिवसेना आक्रमक, महापौरांकडे केली आरोग्य समस्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष सभेची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील बंद लिफ्टसंदर्भात शिवसेना आक्रमक झाली असून या

गोरगरीब, गरजू रुगांसाठी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये 37 रूग्णखाटा राखीव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका आणि परळ येथील ग्लोबल हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार

विसर्जित पीओपीच्या गणेश मूर्तींवर प्रक्रिया करण्यास महापालिकेला सापडेना मुहूर्त

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विसर्जित होणाऱ्या पीओपींच्या मूर्तींवर प्रक्रिया