Painjan Song: पैंजणाच्या नादात खुलणार प्रेमाची कहाणी; अक्षय वाघमारे-रुचिरा जाधवची नवी जोडी

डोंगरदऱ्या, हिरवीगार शेतं आणि गावाकडचं सुंदर वातावरण… अशा निसर्गरम्य परिसरात फुलणारी प्रेमकहाणी सांगणारं साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘पैंजण’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अभिनेता अक्षय वाघमारे आणि बिग बॉस फेम अभिनेत्री रुचिरा जाधव ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

Painjan Song: डोंगरदऱ्या, हिरवीगार शेतं आणि गावाकडचं सुंदर वातावरण, अशा निसर्गरम्य परिसरात फुलणारी प्रेमकहाणी सांगणारं साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘पैंजण’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अभिनेता अक्षय वाघमारे आणि बिग बॉस फेम अभिनेत्री रुचिरा जाधव ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पैंजणाच्या नादात उमललेलं प्रेम, एकमेकांबद्दलची ओढ आणि दोघांमधील सुंदर केमिस्ट्री आपल्याला या गाण्यातून दिसते. तसेच त्यांच्या प्रेमाचे क्षण, गोड नोकझोक आणि एकमेकांबद्दल वाटणारी ओढही गाण्यात पाहायला मिळते. ‘पैंजण’ या गाण्याला रोहित नागभिडे यांचे मधुर संगीत लाभले आहे. तर आनंदी जोशी आणि हर्षवर्धन वावरे यांच्या सुरेल आवाजाने हे गाणे सजले असून डॉ. विनायक पवार यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत. सूरज राजपूत दिग्दर्शित या गाण्याचे संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर निर्माते आहेत.



दिग्दर्शक सूरज राजपूत या बद्दल काय म्हणाले?


पैंजण ही निसर्गरम्य वातावरणात फुलणारी प्रेमकहाणी आहे. या गाण्यातून प्रेमातील निरागसता, हळवे क्षण आणि दोन मनांमधील ओढ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षय आणि रुचिराने आपल्या अभिनयातून ही केमिस्ट्री अतिशय छान पद्धतीने साकारली आहे. तसेच संगीत टीमही कमाल आहे. मला आशा आहे, प्रेक्षकही या गाण्यातून आपल्या प्रेमाच्या आठवणींशी जोडले जातील, असे दिग्दर्शक सुरज राजपूत म्हणाले.







संगीतकार रोहित नागभिडे काय म्हणाले?


प्रेमगीत तयार करताना त्यातील भावना सुरांमधून व्यक्त होणं महत्त्वाचं असतं. ‘पैंजण’साठी संगीत देताना त्यातील ग्रामीण बाज, प्रेमाची हळुवार भावना आणि गाण्याचा गोडवा यांचा सुंदर मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे. आनंदी जोशी आणि हर्षवर्धन वावरे यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली आहे, असे रोहन नागभिडे म्हणाले.


तर या गाण्याचे निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी, मराठी गाण्यांमधून वेगवेगळे विषय आणि भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. तसेच ‘पैंजण’मधील ग्रामीण वातावरण आणि प्रेमाची साधी, सुंदर मांडणी प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असे सांगितले.

Comments
Add Comment

Soorya Movie Updates: सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाला मोठा धक्का! प्रदर्शन लांबणीवर, 2027 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 'गदर 2'च्या यशानंतर सनी देओलच्या

Jijai Movie: ‘जिजाई’चा ट्रेलर पाहून बॉलिवूडही भारावलं; 20 नोव्हेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

Jijai Movie: झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा

गोल्डी ढिल्लनची अमिताभ बच्चन यांना धमकी; मुंबईत 200 साथीदार सक्रिय असल्याचा दावा!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली

Sourav Joshi Vlogs: सौरभ जोशीची व्हिएतनाम ट्रीप चर्चेत! 2 दिवसांच्या हॉटेलसाठी मोजले लाखो रुपये?

Gen Z च्या आवडत्या स्टार्सपैकी एक म्हणजे सौरभ जोशी. तो कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. त्याचे व्लॉग्स

Mrudgandha Puraskar 2026: अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी यांचा होणार सन्मान! ‘मृद्गंध पुरस्कार 2026’साठी मान्यवरांची निवड

मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपणाऱ्या आणि कला क्षेत्रात आपल्या योगदानाने वेगळी ओळख निर्माण

TejRan Wedding News: करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? 'देसी ब्लिंग 2'मध्ये सात फेरे घेणार असल्याची चर्चा!

[caption id="attachment_1075841" align="alignnone" width="800"] टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे आवडत्या जोडप्यांपैकी