Vande Bharat Express : नातेवाईकांना निरोप देण्यासाठी वंदे भारतमध्ये चढले अन् अडकले! 12 जणांना 36,000 रुपयांचा दंड

रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांना प्रत्येकी 3,000 रुपये, म्हणजे एकूण 36,000 रुपयांचा दंड भरावा लागला.

उत्तर प्रदेश : रेल्वे प्रवासात नातेवाईकांना निरोप देण्यासाठी ट्रेनमध्ये चढणे 12 जणांना चांगलेच महागात पडले. उत्तर प्रदेशातील कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चढलेल्या या प्रवाशांचे ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. ट्रेन सुटल्यानंतर त्यांना इटावा स्थानकावर उतरवण्यात आले. रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांना प्रत्येकी 3,000 रुपये, म्हणजे एकूण 36,000 रुपयांचा दंड भरावा लागला.






ही घटना वाराणसी ते नवी दिल्लीदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये घडली. कानपूरमधील वेगवेगळ्या भागांतून आलेले 12 जण आपल्या नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसवण्यासाठी आणि त्यांना सामानासह व्यवस्थित जाण्यास मदत करण्यासाठी गाडीत चढले होते. मात्र, ते ट्रेनमध्ये असतानाच स्वयंचलित दरवाजे बंद झाले आणि ट्रेन स्थानकावरून रवाना झाली.



स्वयंचलित दरवाजांमुळे ट्रेनमधून उतरता आले नाही


वंदे भारत ट्रेनचे दरवाजे ठराविक स्थानकांवरच उघडत असल्याने या प्रवाशांना कानपूरमध्ये उतरता आले नाही. ट्रेन सुटल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कुटुंबीयांची चिंता वाढली. ट्रेनमधील कर्मचाऱ्यांकडे दरवाजे उघडण्याची विनंती करण्यात आली. मात्र, सुरक्षा नियम आणि तांत्रिक कारणांमुळे ट्रेन चालू असताना दरवाजे उघडणे शक्य नव्हते.



इटावा स्थानकावर उतरवले, 36 हजारांचा दंड


या घटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर ट्रेन इटावा जंक्शन येथे थांबवण्यात आली. रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांच्या पथकाने सर्व 12 जणांना सुरक्षितपणे ट्रेनमधून उतरवले. त्यांची चौकशी करून घटनेची नोंद करण्यात आली.


परवानगीशिवाय ट्रेनमध्ये प्रवेश केल्यामुळे रेल्वेच्या वाणिज्य विभागाने प्रत्येकाला 3,000 रुपयांचा दंड ठोठावला. एकूण 36,000 रुपये दंड वसूल केल्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. या घटनेमुळे रेल्वे प्रवासात नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Comments
Add Comment

Pax Silica : सेमीकंडक्टरपासून सुपर इंटेलिजन्सपर्यंत... भारतासह १० देशांचा AI पुरवठा साखळी सुरक्षित करण्याचा ऐतिहासिक निर्णय!

आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही केवळ मनोरंजनाची किंवा साधी संगणकीय सुविधा राहिलेली नाही, तर ती

AI महासत्तेकडे भारताची मोठी झेप! अमेरिका आणि 8 देशांसोबत 'Pax Silica' करार; भारताला काय फायदा?

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आता फक्त संगणकापुरता विषय राहिलेला नाही. ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि

Yogi Aditynath : “भूतकाळ लक्षात ठेवला तरच भविष्य सुरक्षित राहील” : ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सविस्तर स्पष्टीकरण

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, मुख्यमंत्री योगी

झारखंडमधील एनटीपीसी प्रकल्पात कन्व्हेयर बेल्टचा सांगाडा कोसळला, 3 कामगारांचा जागीच मृत्यू

झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील टंडवा येथे असलेल्या राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या प्रकल्पात बुधवारी एक

विश्वासाला तडा! नातवानेच 87 वर्षांच्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला लुटले, मित्रासोबत मिळून उडवले तब्बल 29.5 लाख रुपये!

ज्या वयात कुटुंबाची साथ आणि प्रेमाची सर्वाधिक गरज असते, त्याच वयात घरच्याच व्यक्तीने विश्वासघात केल्याचा

UP Election 2027 : मोदी-शाह यांच्या दौऱ्यांचे नियोजन; उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपची रणनीती तयार

पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारी करत असून रणनीती आखत