Google Play Best Apps 2026 : व्हिडिओ एडिटिंगपासून गेमिंगपर्यंत! Google ने निवडले 2026 मधील सर्वोत्तम अ‍ॅप्स

Google Play Best Apps 2026 : स्मार्टफोनचा वापर आता केवळ कॉलिंग किंवा मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नाही. व्हिडिओ एडिटिंग, आर्ट, AI, फिटनेसपासून ते दैनंदिन कामांपर्यंत अनेक गोष्टींसाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा वापर केला जातो. अशातच Google Play ने 2026 मधील सर्वोत्तम अ‍ॅप्स आणि गेम्सची वार्षिक यादी जाहीर केली आहे. या यादीत Adobe Premiere ने बेस्ट अ‍ॅपचा मान पटकावला असून, Arknights: Endfield या गेमने गेमिंग क्षेत्रात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या यादीत भारतीय अ‍ॅप्स आणि गेम्सनीही आपली छाप पाडली आहे.


Google Play दरवर्षी विविध अ‍ॅप्स आणि गेम्समधील नावीन्य, उपयुक्तता, फीचर्स आणि युजर एक्सपीरियन्सच्या आधारे सर्वोत्तम पर्यायांची निवड करते. यंदाच्या यादीत व्हिडिओ एडिटिंग, AI, क्रिएटिव्हिटी, मनोरंजन, क्रीडा आणि गेमिंग अशा विविध श्रेणींचा समावेश आहे.



Adobe Premiere ठरले 2026 मधील बेस्ट अ‍ॅप


Google Play च्या 2026 मधील बेस्ट अ‍ॅपचा पुरस्कार Adobe Premiere ने पटकावला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सना स्मार्टफोनवरच प्रोफेशनल पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग करता येते. मल्टीट्रॅक एडिटिंग, व्हिडिओवर अचूक नियंत्रण आणि स्पीच एन्हान्समेंट यांसारखे प्रगत फीचर्स या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. आतापर्यंत या अ‍ॅपला 50 लाखांहून अधिक डाउनलोड मिळाले आहेत. क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रात ibis Paint X या अ‍ॅपला पुरस्कार मिळाला आहे. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स विविध शैलींमध्ये इलस्ट्रेशन आणि अ‍ॅनिमेशन तयार करू शकतात.



AI अ‍ॅप Wispr Flow चीही चर्चा


AI तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता Wispr Flow या अ‍ॅपला बेस्ट इनोव्हेटिव्ह अ‍ॅपचा पुरस्कार देण्यात आला आहे. हे अ‍ॅप युजरने बोललेले शब्द टेक्स्टमध्ये रूपांतरित करते. विशेष म्हणजे, हिंदी आणि हिंग्लिशसह अनेक भाषांना ते सपोर्ट करते. बोलताना होणाऱ्या चुका आणि अनावश्यक शब्द काढून मजकूर अधिक व्यवस्थित करण्याची सुविधाही यात मिळते.






भारतीय अ‍ॅप्सनीही मारली बाजी


Google Play च्या यंदाच्या यादीत भारतीय अ‍ॅप्सनीही महत्त्वाचे स्थान मिळवले आहे.


Pronto: दैनंदिन घरगुती कामांसाठी सेवा बुक करण्याची सुविधा देणाऱ्या या अ‍ॅपला बेस्ट प्रोडक्टिव्हिटी पार्टनरचा पुरस्कार मिळाला.


Baby Development and Milestones: लहान मुलांच्या विकासाशी संबंधित माहिती देणाऱ्या या अ‍ॅपला बेस्ट अंडर द रडार अ‍ॅप म्हणून गौरवण्यात आले.


Zolio: Daily Journal & Diary: स्किल बिल्डिंग श्रेणीत या अ‍ॅपला पुरस्कार मिळाला.


Pocket FM: मनोरंजन श्रेणीतील सर्वोत्तम अ‍ॅप ठरले.


FanCode: क्रीडाप्रेमींसाठी सर्वोत्तम अ‍ॅपचा पुरस्कार मिळवला.


याशिवाय स्मार्टवॉचवर पॉडकास्ट ऐकण्याची सुविधा देणाऱ्या Pocket Casts ला बेस्ट अ‍ॅप फॉर वॉचेज, तर Strava ला बेस्ट क्रॉस डिव्हाइस अ‍ॅपचा पुरस्कार मिळाला आहे.



Arknights: Endfield ठरला बेस्ट गेम


गेमिंगच्या दुनियेत Arknights: Endfield या गेमने दोन पुरस्कार पटकावले आहेत. या गेमला बेस्ट गेम आणि बेस्ट स्टोरी या दोन्ही श्रेणींमध्ये गौरवण्यात आले आहे. Google Play वर या गेमला 4.5 रेटिंग असून, 50 लाखांहून अधिक डाउनलोड मिळाले आहेत. याशिवाय Monument Valley 3 या गेमला बेस्ट इंडी गेमचा पुरस्कार मिळाला आहे. आकर्षक व्हिज्युअल पझल्स आणि अनोख्या गेमप्लेमुळे हा गेम विशेष ठरला आहे.



भारतात तयार झालेल्या ScarFall 2.0 ला मोठा सन्मान


भारतीय गेमिंग क्षेत्रासाठीही यंदाची यादी विशेष ठरली आहे. भारतात तयार झालेल्या ScarFall 2.0 या बॅटल रॉयल गेमला बेस्ट मेड इन इंडिया गेमचा पुरस्कार मिळाला आहे. या गेममध्ये मुंबईची लोकल ट्रेन आणि शहरातील परिचित वातावरण पाहायला मिळते. दरम्यान, Pokemon Champions ला बेस्ट मल्टीप्लेयर गेम, तर Astro Arena: 3vs3 MOBA ला बेस्ट पिक अप अँड प्ले गेम म्हणून गौरवण्यात आले आहे.


एकूणच, Google Play च्या 2026 मधील या यादीत AI तंत्रज्ञानापासून ते मनोरंजन आणि गेमिंगपर्यंत अनेक नव्या पर्यायांना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, जागतिक स्तरावरील अ‍ॅप्ससोबत भारतीय अ‍ॅप्स आणि गेम्सनीही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ChatGPT वापरून लोकलचा पास बनवला बनावट! महिनाभर AC लोकलमध्ये प्रवास, अखेर टीसींनी पकडले

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर अनेक कामांसाठी केला जात असताना, त्याचा गैरवापर करून रेल्वेची

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी एजंटला अमेरिकेत तब्बल 27 वर्षांची कठोर शिक्षा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेतील बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्येचा भयंकर कट

IPL 2027 Auction: आयपीएल 2027 लिलावाची प्रतीक्षा संपली! तारीख आणि वेळ जाहीर

आयपीएल स्पर्धेचं 20वं पर्व वर्ष 2027 मध्ये पार पडमार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

Satara District Central Cooperative Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील

मुंबई : सातारा जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेवरून झालेल्या संघर्षानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या

Western Express Highway Bike Stunt: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जीवघेणे बाईक स्टंट; व्हायरल व्हिडिओनंतर 5 तरुणांना अटक!

Western Express Highway Bike Stunt: महाराष्ट्रातील मुंबई शहरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही बाईकस्वार धोकादायक स्टंट करतांना आणि

झारखंडमधील एनटीपीसी प्रकल्पात कन्व्हेयर बेल्टचा सांगाडा कोसळला, 3 कामगारांचा जागीच मृत्यू

झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील टंडवा येथे असलेल्या राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या प्रकल्पात बुधवारी एक