Wednesday, November 18, 2026

मुंबईत चाहत्याला ऑटोग्राफ देण्यास केट मिडलटन यांचा नकार; नेमकं कारण काय?

प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्या मुंबई दौऱ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका चाहत्याने ऑटोग्राफ मागितल्यानंतर केटने नम्रपणे नकार दिला. मात्र, यामागे वैयक्तिक कारण नसून ब्रिटिश राजघराण्याची जुनी परंपरा असल्याचे समोर आले आहे.

प्रिन्स विल्यमसोबत केट मिडलटन मुंबईत दाखल झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चाहत्याने प्रिन्सेस ऑफ वेल्सकडे स्वाक्षरी मागितली, पण केटने नम्रपणे नकार दिला. त्या चाहत्याला इंग्रजीमध्ये म्हणाल्या, 'माफ करा, मी सही करू शकत नाही.' असे असूनदेखील त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी संवाद साधणे सुरूच ठेवले. आता लोकांना प्रश्न पडला आहे की, केटने सही करण्यास का नकार दिला. ही संपूर्ण घटना १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत घडली, जेव्हा केट मिडलटन आणि प्रिन्स विल्यम त्यांच्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. त्या दोघांनी मुंबईतील बलार्ड इस्टेट येथे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसोबत गल्ली क्रिकेट खेळले. या शाही जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

विशेष म्हणजे, सचिन तेंडुलकर चाहत्यांना ऑटोग्राफ देत असताना, एक चाहता केटकडे ऑटोग्राफची विनंती घेऊन आला. केटने हसून माफी मागितली आणि नकार नकार दिला. मात्र तिने त्या चाहत्याशी गप्पा मारणे सुरू ठेवले आणि गर्दीला अभिवादन केले. आता सगळ्यांना प्रश्न पडला की त्यांनी ऑटोग्राफ देण्यास नकार का दिला. खरंतर हा केट मिडलटनचा वैयक्तिक निर्णय नव्हता, तर ब्रिटिश राजघराण्यातील एक जुनी परंपरा होती. राजघराण्यातील सदस्य सहसा लोकांना स्वाक्षरी देणे टाळतात. यामागील एक कारण म्हणजे त्यांच्या स्वाक्षऱ्यांचा गैरवापर किंवा नक्कल होण्याची भीती. मात्र याचा अर्थ असा नाही की राजघराण्यातील सदस्य लोकांपासून दूर राहतात. ते हस्तांदोलन करतात, फोटोसाठी पोझ देतात आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लोकांशी संवादही साधतात. एका चाहत्याची स्वाक्षरीची विनंती नाकारल्यानंतरही केटने मुंबईत लोकांशी संवाद साधणे सुरूच ठेवले होते.

केट आणि प्रिन्स विल्यम यांच्या मुंबई दौऱ्यात क्रिकेटपलीकडचेही अनेक रंजक क्षण अनुभवायला मिळाले. त्यांनी सचिन तेंडुलकरसोबत गल्ली क्रिकेट खेळले, कुल्हरमध्ये बसून कटिंग चहाचा आस्वाद घेतला आणि मुंबई मेट्रोमधून प्रवास केला. त्यांनी शाळकरी मुलांची आणि स्थानिक रहिवाशांचीही भेट घेतली. जवळपास दशकभरानंतर भारतात परतलेल्या विल्यम आणि केट यांचा हा दौरा विशेष आहे, कारण त्यांचा शेवटचा दौरा एप्रिल २०१६ मध्ये झाला होता. मुंबईनंतर ते १८ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत दाखल होतील, जिथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >