नाशिक : शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीत मंगळवारी (दि. 17) सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. महिंद्रा सोना कंपनीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोघांना जीव गमवावा लागला आहे.
अपघातात राजेश भोये यांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा सोना कंपनीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात राजेश कृष्णा भोये यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या धनंजय समाधान पगार (वय 21, रा. सातपूर) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली.
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड ! 42 कोटींच्या गैरव्यवहारात न्यायालयाचा बचाव पक्षाला इशारा, 30 नोव्हेंबरला महत्त्वाची सुनावणी
नाशिक : भक्तांची आर्थिक फसवणूक आणि तब्बल ४२ कोटी ८८ लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अशोककुमार एकनाथ ऊर्फ कॅप्टन अशोक खरात आणि त्याच्या ...
सातपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची नोंद सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.