Thursday, November 19, 2026

K3G 25 Years: K3G ला २५ वर्षे! मुंबईत उभी राहणार रायचंदांची हवेली; चाहत्यांना मिळणार खास अनुभव

K3G 25 Years: प्रत्येक सिनेरसिकाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या 'कभी खुशी कभी गम' च्या रायचंद कुटुंबाला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने करीना कपूर आणि हृतिक रोशनसोबत K3G च्या 25 वर्षांचा उत्सव साजरा करण्यात आला आणि चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या बॉलीवूड कौटुंबिक चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण होत असताना, चाहत्यांना पुन्हा एकदा रायचंद कुटुंबाच्या जगात प्रवेश करण्याची एक दुर्मिळ संधी मिळत आहे.

हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी, एअरबीएनबीने (Airbnb) एका मर्यादित कालावधीच्या आकर्षक अनुभवाचा भाग म्हणून मुंबईत प्रतिष्ठित रायचंद हवेलीची प्रतिकृती तयार केली आहे. 'ॲट होम विथ द रायचंद्स' (At Home with the Raichands) असे शीर्षक त्याला देण्यात आले असून २ तासांच्या अनुभवात चित्रपटातील भव्य जिना आणि पूच्या लाडक्या वॉर्डरोबसह, काही प्रसिद्ध जागांना पुन्हा जिवंत केले आहे.

चित्रपटातील अविस्मरणीय कौटुंबिक क्षणांशी जोडलेली ती भव्य हवेली मुंबईत पुन्हा तयार केली जात आहे. या चित्रपटाचे निर्माते करण जोहर यांच्या सहकार्याने तयार केलेल्या या अनुभवामध्ये, अनुक्रमे रोहन रायचंद आणि पूजा (पू) यांची भूमिका साकारणारे कलाकार हृतिक रोशन आणि करीना कपूर खान यांचाही समावेश आहे. हे कलाकार प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी, चाहते एका आकर्षक ऑडिओ टूरद्वारे चित्रपटातील अविस्मरणीय क्षण पुन्हा अनुभवू शकणार आहेत.

करण जोहर, करीना कपूर आणि हृतिक रोशन यांचा समावेश असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजी उद्घाटनापूर्वी शेअर करण्यात आला आहे. या क्लिपमध्ये पू आणि रोहन रायचंद यांच्या लग्नानंतरची एक झलक पाहायला मिळते, ज्यामुळे या सोहळ्याला एक नॉस्टॅल्जिक टच निर्माण होत आहे.

करण जोहरच्या 2001 सालच्या कभी ख़ुशी कभी गम मध्ये दिसलेल्या आलिशान कौटुंबिक हवेलीपासून हे पुनर्रचित घर प्रेरणा घेते. भव्य जिना, कौटुंबिक अभ्यासिका आणि पूचे आलिशान कपाट यांसारख्या परिचित जागा पाहता येतील. या अनुभवामध्ये ऑडिओ-मार्गदर्शित घर-फेरी आणि संवादात्मक उपक्रमांचाही समावेश असणार आहे, ज्यामुळे चाहत्यांना पडद्यापलीकडे जाऊन चित्रपटाच्या जगाशी जोडले जाण्याची संधी मिळेल.

‘ ॲट होम विथ द रायचंद्स ’ हा अनुभव 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान आयोजित होणार असून, त्यासाठी 180 जागा उपलब्ध आहेत. मुंबईतील ही प्रतिकृती काल्पनिक रायचंद निवासस्थानाला चाहत्यांच्या अधिक जवळ आणते आणि त्यांना त्या जागांना पुन्हा भेट देण्याची संधी देते, ज्या चित्रपटाच्या दृश्यात्मक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनल्या होत्या.

डिसेंबर २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ' कभी खुशी कभी गम ' या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन आणि करीना कपूर खान यांसारखे दिग्गज कलाकार होते. करण जोहर दिग्दर्शित हा कौटुंबिक चित्रपट बॉलिवूडच्या सर्वाधिक आवडलेल्या चित्रपटांपैकी एक आहे, ज्याचे संवाद, संगीत, भव्य सेट आणि अविस्मरणीय पात्रे पिढ्यानपिढ्या चाहत्यांना आकर्षित करत आहेत. धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली यश जोहर निर्मित आणि करण जोहर दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम...' , जो 'के३जी' (K3G) या नावाने लोकप्रिय आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >