Thursday, November 19, 2026

Mumbai Political News: 'बाळासाहेबांचा अपमान ते काँग्रेसशी युती'; उबाठाच्या स्वाभिमानावर जोरदार सवाल!

हिंदुह्रदयस्रमाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कोणताही शिवसैनिक कधीच सहन करणार नाही, हे अगदी खरं आहे. पण ज्यावेळेला तुम्ही हिंदुह्रद्यसम्राट न म्हणता वंदनीय म्हणायला सुरुवात केली, त्यावेळी नाही झाला का त्यांचा अपमान! , अशी टीका शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी उबाठा पक्षावर केली आहे.

Mumbai Political News: हिंदुह्रदयस्रमाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कोणताही शिवसैनिक कधीच सहन करणार नाही, हे अगदी खरं आहे. पण ज्यावेळेला तुम्ही हिंदुह्रद्यसम्राट न म्हणता वंदनीय म्हणायला सुरुवात केली, त्यावेळी नाही झाला का त्यांचा अपमान! , अशी टीका शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी उबाठा पक्षावर केली आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी बुधवारी पुस्तकातील काही पाने आणि छायाचित्रे फाडून निषेध केला. मात्र, यात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाने केला. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले. यावर आता शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी उबाठा पक्षावर चांगलाच घणाघात केला आहे.

डॉ. ज्योती वाघमारे काय म्हणाल्या?

जेव्हा तुम्ही हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणालात, तेव्हा नाही झाला का त्यांचा अपमान! तसेच जेव्हा मुंबई पाण्याने तुडुंब भरलेली होती, त्यावेळी तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वाढदिवस साजरे करत होतात आणि आपल्या स्वत:च्या वडिलांना हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीत एकटं सोडलंत आणि पोलीसांनी त्यांची सुटका केली, तेव्हा नाही झाला का त्यांचा अपमान!, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

पुढे बोलताना, जेव्हा राजसाहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की, शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कशा पद्धतीने छळ केला, त्यांचे जेवणाचे किती हाल केलेत, त्यावेळेला त्यांना नाही झाल्या का यातना! ज्या बाईनं त्यांना म्हातारा म्हटलं, थेरडा म्हटलं तिला स्वत:च्या पक्षामध्ये सन्मानाची पदं दिली, तेव्हा कुठं गेला होता तुमचा स्वाभिमान?, अशी टीका ही त्यांनी उबाठावर केली आहे.

ज्या अबू आझमीनं मराठीचा अपमान केला त्याला मातोश्रीवरती पायघड्या घालून बोलावून त्याचा बाळासाहेबांच्या फोटोसमोर तुम्ही सत्कार करतात तेव्हा कुठं गहाण टाकला होता तुमचा स्वाभिमान? ज्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ‘मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दुंगा, अगर हुई तो मै अपनी दुकान बंद कर दुंगा’, मग त्याच काँग्रेसच्या दारामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण गहाण टाकताना कुठे विकला होता तुम्ही तुमचा स्वाभिमान!

सोनिया गांधींसमोर झुकणाऱ्यांना बाळासाहेब काय म्हणायचे. मग आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे बूट चाटताना कुठे गहाण टाकलाय तुम्ही तुमचा स्वाभिमान? त्यामुळे स्वाभिमानाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आधी स्वत:चा पूर्व इतिहास तपासून बघावा, असे ज्योती वाघमारे यांनी सांगितले आहे. शायना एन.सी यांनी मणिशंकर अय्यर यांचा फोटा फाडला. परंतु तुम्ही मात्र त्या प्रकरणाला वेगळं वळण देताय. शायना एन.सी यांनी माफी मागितली परंतु उबाठा किंवा महाविकास आघाडीच्या एकातरी नेत्यामध्ये हिंमत आहे का, की सोनिया गांधी यांनी सावकरांचा जो अपमान केलाय त्याबद्दल जाब विचारावा, अश्या खरमरीत शब्दांत ज्योती वाघमारे यांनी समाचार घेतला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >