न्यूझीलंडला धक्का! दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 9 गडी राखून नमवलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर
दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला पराभूत केलं. या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे.
November 19, 2026 04:20 PM
न्यूझीलंडला धक्का! दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 9 गडी राखून नमवलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर (Photo: @ProteasMenCSA)
दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 9 गडी राखून पराभवाची धूळ चारली. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 400 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेने 557 धाव केल्या केल्या आणि 157 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना बांगलादेशची दमछाक झाली आणि 168 धावा केल्या. तसेच विजयसाठी 11 धावा करून 12 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 1 गडी गमवून पूर्ण केलं. यासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. सामन्यानंतर टेम्बा बावुमा म्हणाला की, 'दबाव नेहमीच असतो. मला वाटतं, तुम्ही तुमच्या मनात त्याला कसे हाताळण्याचा प्रयत्न करता, यावर ते अवलंबून आहे. मला वाटतं, एक संघ म्हणून आम्ही काय करत आहोत, याबद्दलच्या अपेक्षा वाढतच जाणार आहेत, बरोबर? पण मला वाटतं की, आमच्यासाठी या परिस्थितीला सामोरे जाण्याचा मार्ग म्हणजे, आपण जे काही साध्य करू इच्छितो त्यावर लक्ष केंद्रित करणे.'
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत गाठलं अव्वलस स्थान
दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला पराभवाची धूळ चारली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. दक्षिण अफ्रिकेने 8 सामन्यात 6 विजय आणि 2 पराभवांसह 72 गुण झाले आहेत. दक्षिण अफ्रिकेने 75 विजयी टक्केवारीसह त्यांनी न्यूझीलंड (72.22%) आणि ऑस्ट्रेलिया (69.23%) या बलाढ्य संघांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, अंतिम फेरीच्या शर्यतीतून बांगलादेशचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. बांगलादेशचे या साखळीतील एकूण 12 पैकी 9 सामने पूर्ण झाले असून फक्त 3 कसोटी सामने शिल्लक आहेत. यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1 आणि मायदेशात इंग्लंडविरुद्ध 2 सामने खेळणार आहे. जर बांगलादेशने हे तिन्ही सामने जिंकले, तरीही त्यांची कमाल टक्केवारी केवळ 55.56% पर्यंतच पोहोचू शकेल. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी साधारणपणे 60% ते 65% पेक्षा जास्त गुण आवश्यक असतात.
रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. वनडे फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होत असून एकूण 8 संघ सहभागी आहेत. चार संघाचे दोन गटत असून ...
भारताला अंतिम फेरीची किती संधी?
भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी अजूनही कायम आहे. मात्र हा मार्ग अत्यंत कठीण आहे. सध्या भारत 11 सामन्यांत 5 विजय, 4 पराभव आणि 2अनिर्णित सामन्यांसह 51.52% गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताचे सर्व शिल्लक 7 सामने थेट न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या आघाडीच्या संघांविरुद्ध आहेत. भारताने हे सामने जिंकल्यास या दोन्ही संघांची गुणांची टक्केवारी आपोआप खाली येईल, ज्याचा थेट फायदा भारताला होईल. भारताने या 7 सामन्यांपैकी 2 पेक्षा जास्त सामने गमावल्यास अंतिम फेरीचे दरवाजे जवळपास बंद होतील. तसेच, स्लो ओव्हर-रेटमुळे गुण कापले जाणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागेल.