एक्स बॉयफ्रेंडला घाबरवण्यासाठी ChatGPT वरून बनवली बनावट नोटीस; पण हा काय भलताच प्रकार घडला?

हैदराबादमध्ये एका तरुणीने आपल्या माजी प्रियकराला घाबरवण्यासाठी कथितपणे ChatGPT च्या मदतीने शी टीम्सच्या नावाची बनावट पोलीस नोटीस तयार केली. ही नोटीस खरी समजून तरुण थेट कार्यालयात हजर झाला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

हैदराबाद : प्रेमसंबंधातील दुराव्यामुळे एका तरुणीने आपल्या माजी प्रियकराला घाबरवण्यासाठी शक्कल लढवली, मात्र हीच क्लृप्ती तिच्या अंगलट आली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी प्रियकराला धाक दाखवण्यासाठी कथितपणे ChatGPT च्या मदतीने शी टीम्सच्या नावाने बनावट पोलीस नोटीस तयार करण्यात आली आणि ती WhatsApp वर पाठवण्यात आली. मात्र, पीडित तरुण ही नोटीस खरी मानून थेट शी टीम्सच्या कार्यालयात पोहोचला आणि तिथे गेल्यावर हा सगळा बनाव उघड झाला. या प्रकरणी सैफबाद पोलिसांनी तरुणी आणि तिला मदत करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकाटपल्ली हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील बालाजीनगर येथे राहणारा 24 वर्षीय थिरुनेश्वर वीरंकी याची महिंद्रा विद्यापीठातील 24 वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांमध्ये जवळपास 5 वर्षे प्रेमसंबंध होते. तरुणाने लग्नाचे आश्वासन दिले होते, मात्र गेल्या 1 वर्षापासून त्याने तिच्याशी अंतर राखले होते आणि सोशल मीडियावरही ब्लॉक केले होते, असा आरोप आहे. या परिस्थितीमुळे तरुणी प्रचंड तणावाखाली होती आणि त्यातूनच तिने त्याला घाबरवण्याचा हा मार्ग निवडल्याचे तपासात समोर आले आहे.






अंतर ठेवलेल्या प्रियकराला धाक बसवण्याच्या उद्देशाने तरुणीने शी टीम्सच्या नावाने बनावट नोटीस तयार केली. ही नोटीस बनवण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर हरी नावाच्या व्यक्तीने ही नोटीस पीडित तरुणाच्या WhatsApp वर पाठवली. चौकशीसाठी शी टीम्स कार्यालयात हजर राहण्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. पीडित तरुणाने ही अधिकृत आणि खरी पोलीस नोटीस असल्याचे समजून पुढील पाऊल उचलले.


WhatsApp वर आलेली नोटीस खरी मानून थिरुनेश्वर चौकशीसाठी शी टीम्सच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. अधिकाऱ्यांनी नोटीसची कसून तपासणी केली असता ती पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर शी टीम्सचे एसआय वेंकटेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून सैफबाद पोलीस ठाण्यात तरुणी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या तरुणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेची कलमे 204, 319(2), 336(3), 340(2), 35(2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(C) आणि 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा वापर करून बनावट अधिकृत कागदपत्रे तयार करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

अमित शाह यांच्या हस्ते दहशतवादविरोधी परिषदेचे उद्घाटन; सीमापार दहशतवादावर होणार मंथन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (19 नोव्हेंबर) दोन दिवसीय महत्त्वाच्या दहशतवादविरोधी परिषदेचे

Mahabharat fame Actor Ayush Shah: भरघोस परताव्याचं आमिष अन् 4.44 कोटींचा गंडा! अभिनेता आयुष शाह फसवणुकीचा बळी

Mahabharat fame Actor Ayush Shah: 'महाभारत', 'नव्या' आणि 'उत्तराण' यांसारख्या टीव्ही मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता

शिवसेनेचे माजी आमदार श्रीनिवास वनगा भाजपमध्ये दाखल; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून शिवसेनेवर नाराज असलेले पालघरचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी अखेर

IND vs NZ 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला बसवण्याचा निर्णय योग्यच! प्रशिक्षकांनी दिलं असं कारण

भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पकड मिळवली. पण त्यानंतर ही पकड

यूएनमध्ये भारताचा पाकिस्तानवर मोठा हल्लाबोल! लष्कराच्या त्या कृत्याचा पर्दाफाश करत दिला थेट इशारा

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय मंचावर भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला खडे बोल सुनावत त्यांच्या लष्करी कारवायांवर

Nitesh Rane: टीपू सुलतानला ‘शेर-ए-हिंद’ संबोधणाऱ्या अमित देशमुखांवर मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल

मुंबई : लातूरमध्ये काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी टिपू सुलतान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित