Wednesday, November 18, 2026

Khanna House Worli: वरळीतील खन्ना हाऊसच्या पुनर्विकास प्रस्तावाला सुधार समितीची मंजुरी

वरळीतील खन्ना कंस्ट्रक्शन हाऊस कमर्शियल प्रिमायसेस संस्थेच्या पुनर्विकास प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या सुधार समितीने मंजुरी दिली. ६ वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प ३० वर्षांसाठी देण्यात येणार असून, प्रतिवर्षी प्रति चौरस मीटर १ रुपया दराने मालमत्ता देण्याच्या प्रस्तावावर समितीत चर्चा झाली.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वरळीतील खन्ना कंस्ट्रक्शन हाऊस कमर्शियल प्रिमायसेस संस्थेच्या पुनर्विकास प्रस्तावाला सुधार समितीने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प सहा वर्षे रखडला होता. ही मालमत्ता ३० वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाणार असून कमर्शियल प्रिमायसेस संस्था असल्याने त्यांना प्रतिवर्षी प्रति चौरस मीटरसाठी १ रुपया दराने देण्याचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर आला असता त्यांनी नियमांचे उल्लंघन करणारा हा प्रस्ताव असून महापालिकेच्या ताब्यात ही मालमत्ता आल्यानंतर तिथे गृहनिर्माण संस्था बनते आणि विकासकाची नेमणूक करून हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जातो. यातून महापालिकेला कमी महसूल मिळणा आहे. त्यामुळै हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी केली. तर उबाठाचे सचिन पडव्ळ यांनीही हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवले जावे अशी सूचना करून याठिकाणी सी अँड डी तत्वावर प्रकल्प महापालिका का राबवत नाही असा सवाल केला. जर एमएमआरडीए आणि म्हाडा आपल्या भूखंडावर असे प्रकल्प राबवते तर मग महापालिकेला काय हरकत आहे असा सवाल केला. तर राजा यांनीही याला समर्थन दिले. त्यामुळे याबाबतची फेरविचारासाठी पाठवण्याची उपसूचना बहुमताने नामंजूर करून मूळ प्रस्ताव मंजूर केला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >