IND vs NZ 1st Test: टीम इंडियाची चांगली सुरूवात, पण सहाव्या विकेटने केली गडबड; पहिल्या दिवशी असं घडलं
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून न्यूझीलंडने 5 गडी गमवून 243 धावा केल्या. खरं तर भारताची सुरूवात चांगली झाली होती. पण सहाव्या विकेटने टीम इंडियाच्या मेहनीवर पाणी टाकलं.
November 19, 2026 12:11 PM
IND vs NZ 1st Test: टीम इंडियाची चांगली सुरूवात, पण सहाव्या विकेटने केली गडबड; पहिल्या दिवशी असं घडलं (Photo: BCCI Twitter)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा निर्णय योग्यच होता. कारण पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. अवघ्या 70 धावांवर निम्मा संघ तंबूत पाठवला होता. मात्र त्यानंतर भारताची पकड सैल झाली. निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी डाव सावरला. या दोघांनी 322 चेंडूत 173 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे न्यूझीलंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 5 गडी गमवून 243 धावा केल्या. या दिवशी भारताने 82 षटकं टाकली.
न्यूझीलंडचा पहिल्या दिवशीचा खेळ
न्यूझीलंडचा संघ फलंदाजीला आला तेव्हा पहिल्याच षटकात धक्का बसला. जसप्रीत बुमराहने टॉम लॅथमला खातंही खोलू दिलं नाही. त्यानंतर डेवॉन कॉनवे 13 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. त्याला अंशुल कंबोजने तंबूचा रस्ता दाखवला. रचिन रवींद्रही काही खास करू शकला नाही. त्याचा खेळही 15 धावांवर आटोपला. तर डेरिल मिचेल 1 धाव करून माघारी परतला. विकेटकीपर टॉम ब्लंडल आला आणि 5 धावांवर बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडची 5 बाद 70 धावा अशी स्थिती होती. मात्र त्यानंतर हेनरी निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी डाव सावरला. हेनरी निकोल्सन 221 चेंडूत 14 चौकार मारत नाबाद 113 धावा केल्या. तर ग्लेन फिलिप्सने 182 चेंडूचा सामना करत 13 चौकारांच्या मदतीने नाबाद 94 धावांची खेळी केली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची असलेली कसोटी मालिका भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. दोन्ही संघांसाठी ही ...
जसप्रीत बुमराहचा भेदक मारा
भारताकडून जसप्रीत बुमराहने पहिल्या दिवशी 17 षटकं टाकली आणि 52 धावा देत 3 विकेट काढल्या. तर अंशुल कंबोज आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी एक विकेट काढली. पहिल्या दिवशी दोन्ही संघांचा संमिश्र खेळ राहिला. आता दुसऱ्या दिवशी कोण सरशी घेतं हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. भारतीय गोलंदाजांसमोर जोडी फोडण्याचं मोठं आव्हान असणार आहे. त्यानंतर त्यांना 300 धावांचा आत रोखलं तर भारताला पहिला डाव सोपा जाऊ शकतो. अन्यथा या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी खूपच घाम गाळावा लागेल.