Wednesday, November 18, 2026

अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2027 स्पर्धेसाठी रिटेन केलं की नाही? लखनौ सुपर जायंट्सने स्पष्ट केलं की...

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. अर्जुन तेंडुलकरचं नाव या यादीत आहे की नाही? याकडे लक्ष लागून होतं. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार की मिनी लिलावात उतरणार? फ्रेंचायझीने काय सांगितलं? जाणून घ्या.

आयपीएल 2027 स्पर्धपूर्वी बरंच काही घडताना दिसत आहे. फ्रेंचायझींनी ट्रेड विंडोच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक असलेल्या खेळाडूंना घेतलं. त्यानंतर मिनी लिलावापूर्वी नको असलेल्या खेळाडूंना रिलीज केलं. आता फ्रेंचायझी मिनी लिलावाच्या माध्यमातून खेळाडूंसाठी बोली लावणार आहेत. असं असताना या लिलाव प्रक्रियेपूर्वी अर्जुन तेंडुलकरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीने त्याला कायम ठेवलं आहे. म्हणजेच पुढच्या पर्वातही अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट क्रीडावर्तुळात चर्चेत आहे.

लखनौ सुपर जायंट्सने काय पोस्ट केली?

लखनौ सुपर जायंट्सने अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो शेअर करत लिहिलं की, 'मेहनतीत कोणतीही उणीव नाही, लक्ष्यात कोणतीही चूक नाही.' या संदेशातून फ्रेंचायझीने अर्जुन तेंडुलकरवर विश्वास कायम ठेवला आहे. अर्जुन तेंडुलकरला ट्रेड विंडोच्या माध्यमातून लखनौ सुपर जायंट्सने संघात घेतलं आहे. अर्जुन तेंडुलकरला 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने संघात घेतलं. फ्रेंचायझीने त्याला 20 लाख रुपयांना करारबद्ध केलं. त्यानंतर आयपीएल पदार्पणासाठी 2023 पर्यंत वाट पाहावी लागली. 2025 पर्यंत मुंबई इंडियन्स संघासोबत होता. या दरम्यान, पाच आयपीएल सामने खेळले आणि 3 विकेट घेतल्या. तसेच 13 धावा काढल्या. पण प्लेइंग 11 मध्ये त्याला आपलं स्थान कायम ठेवता आलं नाही.
आयपीएल 2026पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने त्याला ट्रेड करत घेतलं. मुंबई इंडियन्सला 30 लाख रुपये देत संघात घेतलं. आता लखनौ सुपर जायंट्स संघात कायम आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून फक्त एकाच सामन्यात खेळला आहे. त्याने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात एक विकेट काढली. तर पाच धावा केल्या.
आयपीएल 2027 मिनी लिलावात बोली लावण्यासाठी लखनौ सुपर जायंट्सकडे 47.45 कोटी रुपये आहेत. लखनौ सुपर जायंट्सकडे सात जागा रिक्त आहेत.यात तीन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. लखनौ सुपर जायंट्सने ब्रित्झ्के, एनरिक नॉर्खिया, जॉर्ज लिंडे, हसरंगा, नमन तिवारी, अरशीन कुलकर्णी या खेळाडूंना रिलीज केलं आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >