Instagram Story : Instagram Story पोस्ट केल्यानंतरही करता येणार एडिट; 15 मिनिटांची मिळणार मुदत, जाणून घ्या फीचर

मात्र, आता Instagram च्या नव्या फीचरमुळे स्टोरी डिलीट न करताही त्यात बदल करता येणार आहेत.

Technology News: Instagram वापरणाऱ्यांसाठी एक नवे फीचर आणण्यात आले आहे. अनेकदा घाईत स्टोरी पोस्ट केल्यानंतर त्यातील स्पेलिंगची चूक, मजकूर किंवा स्टिकर बदलण्याची गरज भासते. यापूर्वी अशा चुका सुधारण्यासाठी संपूर्ण स्टोरी डिलीट करून पुन्हा अपलोड करावी लागत होती. त्यामुळे आधी मिळालेले व्ह्यूज आणि रिप्लायही गमवावे लागत होते. मात्र, आता Instagram च्या नव्या फीचरमुळे स्टोरी डिलीट न करताही त्यात बदल करता येणार आहेत. ( Instagram Story)



पोस्ट केल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत एडिट करता येणार


Instagram च्या नव्या अपडेटनुसार, स्टोरी पोस्ट केल्यानंतर सुरुवातीच्या 15 मिनिटांपर्यंत त्यात बदल करण्याची सुविधा मिळणार आहे. या कालावधीत युजर्स मजकूर, म्युझिक, स्टिकर्स आणि ड्रॉइंगमध्ये आवश्यक ते बदल करू शकतील.


Instagram चे प्रमुख Adam Mosseri यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या फीचरची माहिती दिली. युजर्सकडून बऱ्याच काळापासून अशा सुविधेची मागणी केली जात होती. त्यामुळे स्टोरी पोस्ट केल्यानंतर लक्षात आलेल्या छोट्या चुका सुधारण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.



असे वापरा नवीन Edit Story फीचर


हे फीचर वापरण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.




  1. सर्वप्रथम Instagram वर आपली पोस्ट केलेली स्टोरी उघडा.

  2. स्क्रीनच्या खालच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सच्या मेन्यूवर टॅप करा.

  3. त्यामधील 'Edit Story' हा पर्याय निवडा.

  4. त्यानंतर मजकूर, म्युझिक, स्टिकर्स किंवा ड्रॉइंगमध्ये आवश्यक बदल करा.

  5. बदल पूर्ण झाल्यानंतर स्टोरी अपडेट करा.


लक्षात ठेवा, ही सुविधा स्टोरी पोस्ट केल्यानंतर केवळ सुरुवातीच्या 15 मिनिटांसाठी उपलब्ध असेल. एडिट केलेल्या स्टोरीवर 'Edited' असे लेबलही दिसेल.



स्टोरी तयार करण्याच्या प्रक्रियेतही बदल


Instagram ने स्टोरी एडिट करण्याच्या सुविधेसोबत स्टोरी तयार करण्याच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. आता स्टिकर्ससाठी नवीन फॉन्ट, रंग आणि आकारांचे पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. स्टिकर्स वेगवेगळ्या शीटमध्ये दाखवले जाणार असल्याने आवडता पर्याय शोधणे सोपे होईल.


याशिवाय, एकाच वेळी अनेक फोटो निवडण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात येत आहेत. स्टोरी तयार करताना नवीन ब्लर इफेक्ट्स, रंग आणि ग्रेडिएंट बॅकग्राउंडचे पर्यायही मिळणार आहेत. या बदलांमुळे युजर्सना आपल्या आवडीनुसार स्टोरी अधिक आकर्षक बनवता येणार आहे.


Comments
Add Comment

Dadar Metro Station : दादर मेट्रो स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ होणार, रेल्वे स्थानकाचे नामकरण नाही; प्रसिद्धीपत्रकातील गोंधळामुळे संभ्रम

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्यात येणार असल्याच्या चर्चेमुळे निर्माण झालेला संभ्रम

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटने उड्डाण रोखले

सोलापुर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या

कॅमरन बेनक्रॉफ्टच्या आरोपानंतर पॅट कमिन्स घरातून बाहेर पडणं झालं कठीण! पत्रकारांकडून प्रश्नांचा भडीमार

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 2018 मध्ये कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेतील एका सामन्यात

दिल्ली विमानतळावर सुरक्षा भेदून आत घुसण्याचा प्रयत्न! CISF जवानांनी काही सेकंदांत पकडला तरुण

नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे सुरक्षा यंत्रणेला चकमा देत

PUC Certificate : 10 वर्षांपेक्षा जुन्या बीएस-4 आणि बीएस-6 वाहनांसाठी दर 6 महिन्यांनी पीयूसी चाचणी अनिवार्य; नियमात बदल

PUC Certificate : वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (PUC) वैधतेबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन

कार्तिकी वारीसाठी 5 कोटींचा निधी! चंद्रभागेच्या घाटावर उतरले उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, स्वतः हातात पाइप घेऊन केली स्वच्छता

पंढरपूर : कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार