Baramati Airport : बारामती विमानतळाच्या विकासासाठी १३२ कोटींचा निधी मंजूर

- धावपट्टी, सुरक्षा यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण होणार; अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर निर्णय

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चर्चेत आलेल्या बारामती विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विमानतळाच्या पायाभूत सुविधा आणि कार्यान्वयनासाठी हा निधी खर्च केला जाणार असून, धावपट्टीसह सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.


बारामती विमानतळाच्या विकासाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या शक्तिप्रदत्त समितीसमोर मांडण्यात आला होता. त्यानंतर विमानतळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला. यापैकी ६४ कोटी रुपये विमानतळाचे संचालन, विकास आणि पायाभूत सुविधांसाठी, तर ६८ कोटी रुपये विमानतळ चालविण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. धावपट्टीच्या कामांसह सुरक्षा विभागाचे आधुनिकीकरण, अग्निशमन व्यवस्थेसाठी क्रॅश फोमची सुविधा आणि सुरक्षा भिंतीची उभारणी या कामांचा त्यात समावेश आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.






बारामती विमानतळाची उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १९९६ मध्ये केली होती. बारामती शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेले हे प्रादेशिक विमानतळ खासगी विमानांच्या उड्डाणांसाठी तसेच वैमानिक प्रशिक्षणासाठी वापरले जाते. विमानतळाची धावपट्टी ५ हजार ५०० फूट लांब आणि १०० फूट रुंद आहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी हे विमानतळ एमआयडीसीकडून हस्तांतरित करण्यात आले होते.


२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईहून बारामतीला आलेले व्हीएसआर कंपनीचे लिअरजेट ४५ विमान विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर विमानतळावरील पायाभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा मुद्दा चर्चेत आला होता.

Comments
Add Comment

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अर्थशास्त्राच्या परीक्षेच्या वेळेत अंशत: बदल; वाचा सविस्तर वेळापत्रक

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल

Dhule News: मणिपूरमध्ये कर्तव्य बजावताना धुळ्याचे सुपुत्र जयेश माळी यांना वीरमरण, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

महाराष्ट्र: मणिपूर राज्यातील इम्फाळ पूर्व परिसरामध्ये देशसेवेचे कार्य करत असताना धुळे तालुक्यातील एका

Prahaar Marathi News Live, 20 November 2026 : खाटूश्यामजी मंदिर परिसरात भीषण आग! भोजनालयाला आग लागल्याने निकास मार्गावर गोंधळ

Prahaar Marathi News Live दिनांक 20 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

Pavana Dam: पवना धरणग्रस्तांना संपादित क्षेत्राइतकी पर्यायी जमीन; कमाल मर्यादा 4 एकर

Pavana Dam: गेल्या सहा दशकांपासून प्रलंबित असलेल्या पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी तालुक्यांत अनावश्यक बांधकामांना स्थगिती

मुंबई : राज्यातील ३१० दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटने उड्डाण रोखले

सोलापुर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या