बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अर्थशास्त्राच्या परीक्षेच्या वेळेत अंशत: बदल; वाचा सविस्तर वेळापत्रक

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. फेब्रुवारी- मार्च 2027 साठी राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीच्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. फेब्रुवारी- मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या परिक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. याबद्दलची माहिती शिक्षण मंडळाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून दिली आहे. बदलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच आपल्या परिक्षेचा अभ्यास करावा अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. इयत्ता दहावीच्या परिक्षेच्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर, बारावीच्या इतरत्र कोणत्याही विषयाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला नाही.






पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामध्ये, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हे नवीन सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. फेब्रुवारी- मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी परीक्षांची दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर 6 नोव्हेंबर 2026 रोजी, उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेतील अर्थशास्त्र या विषयाच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्यात येत आहे. त्याचा तपशील विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल.






इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेमध्ये घेण्यात येणार होता. परंतु आता वेळापत्रकामध्ये करण्यात आलेल्या अंशतः बदलाप्रमाणे, अर्थशास्त्राचा पेपर 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या सुधारित तपशीलाची नोंद विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करून घ्यावी. दिलेल्या बदलाव्यतिरिक्त उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी परीक्षांच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.






दरम्यान, "परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक ते अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.", याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.

Comments
Add Comment

Dhule News: मणिपूरमध्ये कर्तव्य बजावताना धुळ्याचे सुपुत्र जयेश माळी यांना वीरमरण, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

महाराष्ट्र: मणिपूर राज्यातील इम्फाळ पूर्व परिसरामध्ये देशसेवेचे कार्य करत असताना धुळे तालुक्यातील एका

Prahaar Marathi News Live, 20 November 2026 : वेलिंग्टन कसोटीमध्ये न्यूझीलंडचा पहिला डाव 368 धावांवर आटोपला

Prahaar Marathi News Live दिनांक 20 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

Pavana Dam: पवना धरणग्रस्तांना संपादित क्षेत्राइतकी पर्यायी जमीन; कमाल मर्यादा 4 एकर

Pavana Dam: गेल्या सहा दशकांपासून प्रलंबित असलेल्या पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी तालुक्यांत अनावश्यक बांधकामांना स्थगिती

मुंबई : राज्यातील ३१० दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटने उड्डाण रोखले

सोलापुर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या

कार्तिकी वारीसाठी 5 कोटींचा निधी! चंद्रभागेच्या घाटावर उतरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वतः हातात पाइप घेऊन केली स्वच्छता

पंढरपूर : कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार