IND vs NZ 1st Test: दुसऱ्या दिवसावर टीम इंडियाची पकड, दिवसअखेर 1 गडी बाद 159 धावा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने कमबॅक केलं. भारताने 1 गडी गमवून 159 धावा केल्या आणि 209 धावांनी पिछाडीवर आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने 6 गडी गमवून 243 धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. पण न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात 4 गडी गमावले आणि खेळ 368 धावांवर आटोपला. न्यूझीलंडचा हेनरी निकोल्स 175 धावांवर नाबाद राहिला. तर ग्लेन फिलिप्स 118 धावांवर बाद झाला. या व्यतिरिक्त न्यूझीलंडचा एकही खेळाडू 15 धावांच्या पुढे धावा करू शकला नाही. या दोघांच्या खेळीमुळे न्यूझीलंडचा संघ चांगल्या स्थितीत आला. भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी केली. त्याने 29 षटकं टाकली आणि 92 धावा देत 4 विकेट काढल्या. तर आकाश दीपने 3, अंशुल कंबोजने 2 आणि प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट काढली.

भारताचा डाव


न्यूझीलंडने पहिल्या डावात केलेल्या 368 धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरूवात केली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या जोडीने पहिल्या विकेटसाठी 167 चेंडूत 130 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वालने 89 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी मोर्चा सांभाळला. केएल राहुलने 116 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कल 35 चेंडूचा सामना करत नाबाद 16 धावांवर राहिला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एक गडी गमवून 159 धावा केल्या आहे. भारतीय संघ अजूनही 209 धावांनी पिछाडीवर आहे. आता तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.





वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित


भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवायची असेल तर हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने भारतीय संघाला आपल्याच देशात 3-0 ने मात दिली होती. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. इतकंच काय 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी हुकली होती. आता न्यूझीलंडला धडा शिकवण्याची चांगली संधी टीम इंडियाकडे आहे. भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने मात दिली तर न्यूझीलंडचं अंतिम फेरीत खेळण्याचं गणित चुकू शकतं.
Comments
Add Comment

भारताने न्यूझीलंडला 3-2 ने पराभवाची धूळ चारली, शताब्दी हॉकी मालिकेत टीम इंडियाची विजयी सलामी

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमधील ऐतिहासिक क्रीडा संबंधांना 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने

कॅमरन बेनक्रॉफ्टच्या आरोपानंतर पॅट कमिन्स घरातून बाहेर पडणं झालं कठीण! पत्रकारांकडून प्रश्नांचा भडीमार

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 2018 मध्ये कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेतील एका सामन्यात

न्यूझीलंडला धक्का! दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 9 गडी राखून नमवलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर

दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 9

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेला आजपासून सुरूवात, जाणून भारताचा सामना कधी आणि पूर्ण शेड्यूल

रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. वनडे फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होत असून एकूण 8 संघ

IND vs NZ 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला बसवण्याचा निर्णय योग्यच! प्रशिक्षकांनी दिलं असं कारण

भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पकड मिळवली. पण त्यानंतर ही पकड

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम; माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथचा विक्रम मोडीत!

[caption id="attachment_1076800" align="aligncenter" width="800"] भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा मैदानात