गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडणार असून यंदाच्या महोत्सवात 13 कोंकणी चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीचे मुख्य केंद्र असलेली मुंबई ही मराठी चित्रपटसृष्टीचीही समृद्ध परंपरा जपणारी नगरी आहे. बॉलिवूडला समांतर विकसित झालेल्या मराठी चित्रपटसृष्टीने आशयघन कथन, वास्तववादी मांडणी आणि साहित्याशी असलेली घट्ट नाळ यांच्या बळावर स्वतःची वेगळी, स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यंदा IFFI मध्ये तब्बल 1-2 नव्हे तर 13 मराठी चित्रपट मंचावर झळकणार आहेत.
गोव्यात होणाऱ्या 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 6 मराठी फिचर चित्रपट पाहायला मिळणार आहेत. त्यात आदी अनंत, बाप्या, देऊळ बंद 2, तिघी, तू आहेस ना, साधी माणसं या चित्रपटांचा समावेश आहे. तर मिरामार बीचवर होणाऱ्या ओपन एअर स्क्रीनिंगमध्ये 2 मराठी चित्रपट पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये नटसम्राट, आणि बोंबीलवाडीचा समावेश आहे. सोबतच यंदा 5 मराठी नॉन- फीचर लघुपट देखील पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये शिक्षा, आभाळ-वृक्ष, चांदोबा, दर्या, मीडियम पीस पाहायला मिळणार आहे.
दोन वर्षांनंतर हर्षद अतकरी छोट्या पडद्यावर; 'येतेच आता मी नांदायला'मध्ये साकारणार अभिजीत थोरात
Yetach Ata Mi Nandayla: 'येतेच आता मी नांदायला' या झी मराठीच्या आगामी मालिकेतून अभिनेता हर्षद अतकरी जवळपास दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ...
भारतीय पॅनोरमाच्या कथाबाह्य चित्रपट विभागातही तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. या तिन्ही चित्रपटांमधून वेगवेगळ्या विषयांची मांडणी करण्यात आली आहे. अमित पाटकर दिग्दर्शित ‘पनिशमेंट’ अर्थात ‘शिक्षा’ या चित्रपटात परस्परांशी संबंध नसलेल्या वाटणाऱ्या चोरीच्या दोन घटनांच्या माध्यमातून अपराध-भाव आणि त्याचे परिणाम यांचा वेध घेण्यात आला आहे. संतोष डावखर दिग्दर्शित ‘स्काय ट्री’ अर्थात ‘आभाळवृक्ष’ या चित्रपटात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एका गावकऱ्याच्या आशा-आकांक्षांचे चित्रण चित्रपटात करण्यात आले आहेत. तर निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘द मून’ अर्थात ‘चांदोबा’ या चित्रपटात कोड या त्वचारोगाचा सामना करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाचा संघर्ष आणि या आजारामुळे त्याला समाजाकडून मिळणारी वागणूक यांचे चित्रण करण्यात आले आहे.
तसेच महोत्सवाच्या शताब्दी अभिवादन विभागात मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशाचाही गौरव करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. या निमित्ताने 1965 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा ‘साधी माणसं’ हा मराठी चित्रपट राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून पुनर्संचयित स्वरूपात प्रदर्शित केला जाणार आहे.